शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौरांकडून स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती

By admin | Updated: May 25, 2016 00:20 IST

महापालिकेत बैठक : आरोग्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती

सांगली : कुत्र्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या कारभाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी उपमहापौर विजय घाडगे यांनी स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती घेत, आरोग्य विभागाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सोमवारपर्यंत कृती आराखडा तयार करण्याचे आदेश घाडगे यांनी दिले आहेत. सरस्वतीनगर येथे नुकताच कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मंगळवारी उपमहापौर विजय घाडगे, स्वाभिमानी आघाडीचे गटनेते शिवराज बोळाज, नगरसेवक बाळू गोंधळी यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. बैठकीला आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे गैरहजर होते. बैठकीत स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती घेण्यात आली. बालिकेच्या मृत्यूनंतर कुत्री पकडण्याच्या मोहिमेचाही उपमहापौरांनी आढावा घेतला. गेल्या दोन दिवसात केवळ २२ कुत्री पकडण्यात आल्याचे स्वच्छता निरीक्षकांनी स्पष्ट केले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. स्वच्छता निरीक्षकांना नागरिकांच्या सुरक्षिततेचे भान राहिलेले नाही. घरात बसून स्वच्छतेचे नियोजन सुरू आहे. रस्त्यावर कचरा मोठ्या प्रमाणात पडला आहे. मोकाट कुत्र्यांची नागरिकांत दहशत आहे. तरीही त्याचे गांभीर्य स्वच्छता निरीक्षकांना नाही, अशा शब्दात त्यांनी फटकारले. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सोमवारपर्यंत आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार करण्याची सूचना करीत ते म्हणाले की, कुत्री पकडण्यासाठी केवळ सहा कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली पाहिजे. त्यासाठी साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डॉग व्हॅनवर घ्यावे. सकाळच्या टप्प्यात स्वच्छतेचे काम आणि दुपारनंतर कुत्री पकडण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आदेश दिले. कुत्री पकडण्यासाठी पालिकेकडे जाळ्याही नाहीत. अपुरी साधने आहेत, अशी तक्रारही स्वच्छता निरीक्षकांनी केली. आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकांना साफसफाईच्या कामात फारसा रस नाही. विविध परवाने देण्यासाठी निरीक्षक जितकी तत्परता दाखवितात, तितकी तत्परता स्वच्छतेच्या कामात दाखविली तरी शहरातील अनेक समस्या सुटू शकतील. यापुढील काळात नाहरकतचे परवाने देण्याचा उद्योग स्वच्छता निरीक्षकांनी बंद करावा, असे आदेशही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)