शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘वडाप’सह चालक झाला गायब

By admin | Updated: September 12, 2016 00:20 IST

पोलिसांकडून शोध : मोबाईल नदीतच; मुंबईतील पाणबुड्यांशी संपर्क

 सांगली : येथील गवळी गल्लीतील गुंड मिलिंद ऊर्फ मिंच्या गवळी याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यासाठी लाकडे नेलेला सांगलीवाडीतील वडापचालक ‘वडाप’सह गायब झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत असले तरी, अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. दरम्यान, मिंच्याचा मोबाईल कृष्णा नदीत असल्याचे जीवरक्षक टीमच्या पाण्यातील कॅमेऱ्यामुळे दिसून आले आहे. पण तो काढण्यात अडथळे येत असल्याने, पोलिसांनी मुंबईतील पाणबुड्यांशी संपर्क साधला आहे. गेल्या आठवड्यात मिंच्याचे अपहरण करुन समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोजवळ त्याचा डोक्यात गोळी घालून खून करण्यात आला. संशयितांनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कारंदवाडी (ता. वाळवा) येथे निर्जन ठिकाणी जाळला. त्याची रक्षा व हाडे कृष्णा नदीत फेकून दिली. याप्रकरणी आतापर्यंत मुख्य संशयित राहुल भोसले, सिद्धार्थ चिपरीकर व कवठेपिरान (ता. मिरज) येथील ग्रामपंचायत सदस्य भागवत पाटील या तिघांना अटक केली आहे. सध्या तिघेही पोलिस कोठडीत आहेत. खून करण्यापूर्वी त्यांनी मिंच्याची चिता रचली होती. यासाठी सांगलीवाडीतून एका ‘वडाप’ गाडीतून लाकडे नेल्याची माहिती तपासातून पुढे आली होती. या वडाप चालकाचा पोलिस शोध घेत आहेत. पण खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर तोही गायब झाला आहे. तो सापडल्यानंतर चिता रचण्यासाठी आणखी कोण होते, याचा उलगडा होणार आहे. या प्रकरणात आणखी तीन ते चार जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. संशयितांनी मिंच्याची ‘गेम’ केल्यानंतर त्याचा मोबाईल त्यांनी काढून घेऊन बंद केला. त्याचदिवशी त्यांनी हा मोबाईल बायपास रस्त्यावरील पुलावरुन कृष्णा नदीत फेकून दिला. तपासाच्यादृष्टीने हा महत्त्वाचा पुरावा असल्याने पोलिसांनी ‘जीवरक्षक’ टीमच्या मदतीने नदीत मोबाईलचा शोध घेतला. या कॅमेऱ्याच्या मदतीने मोबाईल पाण्यात पडल्याचे दिसून आले आहे. पण तो पंधरा ते वीस फूट अंतरावर आहे. तो काढण्यासाठी पाणबुड्यांची गरज आहे. पोलिसांनी महापालिकेकडे मदत मागितली होती. मात्र त्यांच्याकडे पाणबुड्यांची सोय नाही. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोबाईल पाण्यातच पडून आहे. आता पोलिसांनी मुंबईतील पाणबुड्यांशी संपर्क साधला आहे. तसेच मिंच्याच्या अस्थींचा शोध घेण्यात आला. एक पोते व त्यामध्ये तीन-चार अस्थी सापडल्या आहेत. त्या मिंच्याच्याच आहेत का, याचा उलगडा करण्यासाठी पुढील तपासणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी) गणेशोत्सव बंदोबस्ताचा तपासावर परिणाम सध्या गणेशोत्सव सुरू आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्त करावा लागत असल्याने याचा परिणाम मिंच्याच्या खून तपासावर झाला आहे. अनेक बाबी तपासातून उजेडात आल्या आहेत, पण त्याचा तपास करण्यास पोलिसांना वेळ कमी पडत आहे. अजूनही खुनाचे मूळ कारण स्पष्ट झालेले नाही. पिस्तूल कोठून आणले होते, याचा उलगडा झालेला नाही. खुनाचा कट कुठे शिजला? आणखी कोणाचा सहभाग आहे? हेही निष्पन्न झालेले नाही.