शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेजची पूर्ण कामे घुसडण्याचा डाव

By admin | Updated: July 14, 2015 00:41 IST

महापालिका सदस्यांतून नाराजी : सत्ताधारी, प्रशासनाची चलाखी

सांगली : सांगली, मिरज शहरातील मंजूर ड्रेनेज योजनेत पूर्ण झालेली काही कामे घुसडण्याचा डाव प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी आखल्याचा आरोप होऊ लागला आहे. या प्रस्तावाला बहुतांश नगरसेवकांचा विरोध आहे. हा विरोध हाणून पाडण्यासाठी काही नगरसेवकांच्या प्रभागातील ड्रेनेजची कामेही नव्या प्रस्तावात समाविष्ट करून त्यांना गाजर दाखविण्यात आले आहे. या विषयावर महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. महापालिकेची महासभा २० रोजी होत आहे. या सभेच्या अजेंड्यावर ड्रेनेजच्या वाहिन्यांचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा विषय घेण्यात आला आहे. पण या विषयपत्रात प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी संगनमताने चलाखी केली आहे. पालिकेतील कारभारी नगरसेवकांच्या प्रभागात मंजूर प्रकल्प आराखड्यात समाविष्ट नसलेल्या जागी ड्रेनेज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यापोटी ठेकेदाराला काही रक्कमही अदा केली आहे. पण त्याला महासभेची मंजुरी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे बिलाबाबत प्रशासन अडचणीत सापडले आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी या प्रस्तावाला मंजुरी घेण्याचा प्रयत्न झाला. पण महासभेत गोंधळ झाल्याने हा ठराव रद्द करण्यात आला होता. त्यामुळे कारभारी नगरसेवकांना धक्का बसला. यावर तोडगा काढण्यासाठी आता नवीन शक्कल लढविली गेली आहे. मिरजेतील कामासोबतच सांगलीतील काही प्रभागात ७५ हजार मीटर ड्रेनेज वाहिन्या टाकण्याची आवश्यकता असल्याची सबब पुढे करण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीतून जुन्या प्रस्तावाला होणारा विरोधही मावळेल आणि मिरजेत पूर्ण झालेल्या ड्रेनेज वाहिन्यांचा मूळ आराखड्यात समावेश होईल. त्यातून प्रशासन व कारभारी नगरसेवकांची झालेली कोंडीही फुटेल, असा डाव आखला आहे. पण या प्रस्तावाला बहुतांश नगरसेवकांचा विरोध आहे. ही कामे कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, असा नवा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव नामंजूर करण्याची जोरदार मागणी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)