शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वंचित भागातील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, कुंभारगाव व खानापूर तालुक्यातील जाधवनगर, बलवडी, पलूस तालुक्यातील कुंडलचा काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, कुंभारगाव व खानापूर तालुक्यातील जाधवनगर, बलवडी, पलूस तालुक्यातील कुंडलचा काही भाग व कोयना वसाहत, पलूस व आंधळी आदी गावांच्या दोन हजार ४०४ हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देणाऱ्या ताकारी योजनेच्या वितरिका क्रमांक दोनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे वितरिकेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्नही साकार होत आहे. आता २१ फेब्रुवारी रोजी ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होत आहे. यानंतर

लवकरच या वितरिकेची चाचणी होणार आहे. यामुळे लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनाही या चाचणीची उत्सुकता लागली आहे.

वंचित भागातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी या वितरिकेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. त्यांच्या कार्यकाळात या वितरिकेला मंजुरी

मिळाली होती. २००५ मध्ये आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते या कामाचे भूमिपूजनही झाले होते.

भूसंपादनामधील तक्रारीमुळे या वितरिकेच्या कामाला काही शेतकऱ्यांचा विरोध होता. यामुळे वर्षानुवर्षे हे काम रखडले होते. यावर मार्ग काढण्यासाठी ९ किमी लांबीच्या मुख्य वितरिका व १६ किमी लांबीच्या उपवितरिकांसाठी बंदिस्त पाईपलाईन करण्याचा २०१८ मध्ये

शासन स्तरावर निर्णय झाला. भूसंपादन होणारच नसल्याने शेतकऱ्यांचा विरोधही संपला.

बंदिस्त पाईपलाईनसाठी खुदाई करताना झालेली शेतकऱ्यांची पीक व अन्य नुकसानभरपाई शासनाकडून

बहुतांशी शेतकऱ्यांना दिली आहे. एकंदरित ११ कोटी ८२ लाखांच्या निधीतून हे काम पूर्ण झाल्याने या वितरिकेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खुदाई काम करताना झालेल्या पीक नुकसानभरपाईबाबत काही शेतकऱ्यांच्या तक्रारी असून, त्या शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळणे गरजेचे आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

चौकट

चेंबरद्वारे मिळणार पाणी

मुख्य वितरिकेला जोडलेल्या उपवितरिकांमधून बंदिस्त पाईपलाईनद्वारे लाभक्षेत्रातील आठ गावांमधील वेगवेगळ्या २८ ठिकाणच्या शिवारात जागोजागी चेंबरद्वारे पाणी दिले जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी ८० ते १०० हेक्टर शेतजमिनीला पाणी देणार आहेत.

फोटो ओळ :

देवराष्ट्रे (ता. कडेगाव) हद्दीत ताकारी योजनेच्या मुख्य कालव्याला जोडलेल्या क्रमांक दोनची सुरुवात या ठिकाणी होते.