शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

ड्रेनेज योजना पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी

By admin | Updated: September 26, 2015 00:21 IST

केवळ ३७ टक्के काम पूर्ण : ठेकेदारावर पालिका प्रशासन मेहेरबान

सांगली : नियमबाह्य कामांचा सपाटा, टक्केवारीचा आरोप, ठेकेदारावर प्रशासनाची मेहेरनजर अशा अनेक कारणांनी वादग्रस्त बनलेल्या महापालिकेच्या सांगली-मिरज भुयारी गटार (ड्रेनेज) योजनेचे भवितव्य अंधारात जात आहे. योजनेची मुदत संपली असून आतापर्यंत केवळ ३७ टक्केच काम पूर्ण झाले आहे. कामाची गती संथ असल्याने प्रशासनावर नगरसेवकांचा दबाव वाढू लागला आहे. त्यात आता राज्य शासनाने ड्रेनेजमधील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिल्याने महापालिका प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले आहे. सांगली-मिरज या दोन्ही शहरात ४० वर्षांपूर्वीची ड्रेनेज योजना होती. त्यानंतर शहराचा विस्तार वाढला, पण ड्रेनेजची व्यवस्था होऊ शकली नाही. महापालिकेने सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांसाठी स्वतंत्र ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव पाठविला. त्यापैकी सांगलीच्या ८२.२२ कोटी व मिरजेच्या ५६.५३ कोटीच्या योजनेला नगरोत्थान योजनेतून शासनाने मंजुरी दिली. शासनाचे ५० टक्के अनुदान व महापालिकेचा ५० टक्के हिस्सा, असे योजनेचे स्वरुप होते. पण ड्रेनेज योजना मंजूर झाल्यापासूनच त्याला वादाचे ग्रहण लागले आहे. तत्कालीन महापौर इद्रिस नायकवडी यांच्या काळात ड्रेनेजवरून बरेच रामायण घडले. अखेर महासभेत बहुमताच्या जोरावर योजनेला मान्यता देण्यात आली. या योजनेची निविदा २९ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रत्यक्षात ३० एप्रिल २०१३ रोजी ड्रेनेजच्या कामास सुरुवात झाली. या वर्षभरात निविदा प्रक्रियेला स्थगिती, सुधारित निविदा प्रक्रिया, देकार रकमेवरून वाद, जादा दराच्या निविदेमुळे ठेकेदाराशी वाटाघाटी, महासभेची मान्यता, वर्कआॅर्डर, यामध्ये वेळकाढूपणा करण्यात आला. एक वर्ष वाया गेल्याने उर्वरित दोन वर्षात योजनेचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासन व ठेकेदाराची होती. पण त्यात दिरंगाई झाली आहे. एक मे रोजी योजनेची मुदत पूर्ण झाली. गेल्या दोन वर्षात ड्रेनेज ठेकेदाराने सांगली, मिरजेत ३५ ते ४० टक्के काम पूर्ण केले आहे. सांगलीतील आॅक्सिडेशनचे काम रखडले आहे. त्यात ड्रेनेज योजनेत मिरज व सांगलीत १६ किलोमीटरचे आराखडाबाह्य काम झाल्याचा आरोप होत आहे. विरोधी राष्ट्रवादीने, तर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी दाद मागून चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरच महसूल विभागामार्फत चौकशी सुरू होणार आहे. शासन आदेशाने या योजनेचे थर्डपार्टी आॅडीट करण्यात आले आहे. या अहवालातही प्रशासनावर गंभीर दोष ठेवले आहे. ठेकेदाराला प्रत्यक्ष कामापेक्षा जादा बिल अदा करण्यात आल्याची बाबही उघडकीस आली आहे. योजनेसाठी झालेला पाईपपुरवठा व प्रत्यक्षात केलेली पाईपलाईन यात तफावत आढळते. ड्रेनेज योजनेची मुदत मे महिन्यातच संपली आहे. ठेकेदाराला मुदतवाढ न देताच काम सुरू आहे. त्याचे खापरही प्रशासनावर फोडले आहे. या योजनेतील सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला करारापेक्षा जादा फी अदा केली आहे. अशा अनेक त्रुटीमुळे ही योजना वादाच्या केंद्रबिंदू बनली आहे. (प्रतिनिधी)निधीची अडचण कायमड्रेनेज योजनेसाठी शासनाकडून आतापर्यंत ५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. महापालिकेने हिश्श्यापोटी २० कोटी रुपये तरतूद केली आहे. योजनेच्या पूर्ततेसाठी अजून १५० कोटींची गरज आहे. त्यासाठी पाणी पुरवठा विभागाने कर्जाचा प्रस्ताव लेखा विभागाकडे सुपूर्द केला आहे. या योजनेच्या मंजुरीवेळी राज्य शासनाने कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी घेतली होती. पण आता शासनानेच हात झटकले आहेत. त्यामुळे महापालिकेला सध्याच्या दराने बँकांकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यामुळे या जादा व्याजाचा भुर्दंड पालिकेवर बसणार आहे.