शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

चांदोली धरणाचे दरवाजे उघडले

By admin | Updated: July 31, 2014 00:11 IST

पावसाचा जोर कायम : शिराळा तालुक्यात चार घरांची पडझड

वारणावती/कुची : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, गेल्या २४ तासात ६३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे आज, बुधवार (दि. ३0) दुपारी १ वाजता धरणाचे चारही वक्राकार दरवाजे 0.२५ मीटरने उचलण्यात आले आहेत. येथून २ हजार ३९0 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात वाढ झाली असून नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे वारणावतीचे शाखा अभियंता प्रदीप कदम यांनी केले आहे.गेल्या १५ दिवसांपासून चांदोलीत मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. यंदा पावसाने उशिरा सुरुवात केली. त्यामुळे धरण भरणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र गेल्या ८ दिवसात वाढलेला पाऊस आणि धरणातून पूर्ण बंद असलेला विसर्ग यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली. तीन दिवसांपूर्वीच या पातळीने सांडवा पातळी ओलांडली होती. मात्र गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा थोडा कमी होता, म्हणून दरवाजे बंद करण्यात आले होते. आज अपेक्षित पाणीपातळी झाल्याने दरवाजे उघडून २३९0 व वीज निर्मिती केंद्रातून १७७५ असा एकूण ४ हजार १६५ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला.सकाळी ११ वाजता शाखा अभियंता प्रदीप कदम, रेवणनाथ खोत, भीमराव पाटील, रमेश सनगर, उदय गडकरी, बबन कांबळे आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाण्याचे पूजन करुन ओटीभरण केले. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्गही वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ६२२.00 मीटर, तर पाणीसाठा ८३४.९४९ द.ल.घ.मी. (२९.४८ टी.एम.सी.) इतका आहे. धरण ८५.७0 टक्के भरले असून आजअखेर १६८८ मि.मी. पावसाची येथे नोंद झाली आहे. कुची व परिसरात रिमझिम सुरू असून, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (वार्ताहर)