शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या मृत्यूमुळे डॉक्टरांना मारहाण

By admin | Updated: October 30, 2014 01:14 IST

नातेवाइकांचा गोंधळ : मिरजेत सोर्टुर रुग्णालयातील प्रकार

मिरज : मिरजेतील सोर्टुर रुग्णालयात महिला रुग्णाच्या मृत्यूमुळे नातेवाइकांनी गोंधळ घालून ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिवानंद सोर्टुर यांना आज, बुधवारी मारहाण केली. डॉ. सोर्टुर यांच्या अटकेच्या मागणीसाठी रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयासमोर धरणे आंदोलन केले. आरग (ता. मिरज) येथील सविता लक्ष्मण देसाई (वय ३८) यांच्या छातीत दुखत असल्याने रात्री दीड वाजता सोर्टुर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. सोर्टुर यांचे सहायक डॉ. अनिल शेळके हे देसाई यांच्यावर उपचार करीत होते. मात्र, सविता देसाई यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने नातेवाईकांनी डॉ. सोर्टुर यांना बोलावून घेण्याची विनंती केली; मात्र डॉ. सोर्टुर यांना नातेवाईकांनी दूरध्वनी केला असता, त्यांनी येण्यास नकार देऊन सहाय्यक डॉक्टर उपचार करतील, असे सांगितले. अत्यवस्थ सविता देसाई यांचा दुपारी मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले. डॉ. सोर्टुर व त्यांचे सहाय्यक डॉ. शेळके यांना मारहाण करून अतिदक्षता विभागाच्या दरवाजाची मोडतोड करण्यात आली. आरग येथील ग्रामस्थही रुग्णालयासमोर जमले. डॉक्टरांनी रुग्णाकडे दुर्लक्ष करून सहाय्यक डॉक्टर व परिचारिकेकडून उपचार केल्यामुळे सविता देसाई यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत उपचारात हलगर्जीपणा केल्याबद्दल डॉ. सोर्टुर यांना अटक करावी, अशी मागणी करीत नातेवाईक व आरगचे सरपंच एस. आर. पाटील, बी. आर. पाटील, श्रीकांत पाटील, दीपक जाधव, सिकंदर मकानदार, अनिल कोरबू यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर धरणे धरले. डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाल्याने राज्य राखीव दलाचा बंदोबस्त पाचारण करण्यात आला. डॉ. सोर्टुर यांना मारहाण झाल्याचे वृत्त समजल्यानंतर शहरातील अनेक डॉक्टर सोर्टुर रुग्णालयात आले. पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांनी तक्रारीची चौकशी करून डॉक्टरांवर कारवाईचे आश्वासन दिले; मात्र जमावाने डॉक्टरांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने डॉ. शिवानंद सोर्टुर यांना पोलीस वाहनातून तेथून हलविण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सुमारे पाच तास डॉ. सोर्टुर यांच्या रुग्णालयात गोंधळ सुरू होता. सविता पाटील यांच्या मृत्यूबाबत पती लक्ष्मण पाटील यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी सांगितले. डॉ. सोर्टुर यांचा जबाब पोलीस ठाण्यात नोंदवून घेण्यात आला. (वार्ताहर)