शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर दाम्पत्याच्या खुनाचे धागेदोरे हाती

By admin | Updated: December 27, 2015 00:09 IST

गतीने तपास : सेविकेसह प्रियकराकडे चौकशी; आणखी चौघांचा सहभाग शक्य

इस्लामपूर : येथील जावडेकर चौकातील डॉ. प्रकाश कुलकर्णी व त्यांची पत्नी डॉ. अरुणा कुलकर्णी यांच्या खून प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता दिसत आहे. त्यांच्या रुग्णालयात वयाच्या चौदा वर्षापासून काम करणारी सेविका आणि तिचा प्रियकर या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पाच दिवस होऊन गेले तरी, पोलिसांनी तपासाबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे. या दुहेरी खुनाचे खरे सूत्रधार वेगळेच असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून पुढे येत आहे. डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या खून प्रकरणाला आठवडा झाला तरी, तपासाला फारशी गती मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या तपास कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हिवाळी अधिवेशनात आ. जयंत पाटील यांनी हा दुहेरी खून आणि वाळवा तालुक्यातील गुन्हेगारीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. हा तपास करताना पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. डॉ. पती-पत्नीचा खून अनैतिक संबंधाला असलेल्या विरोधातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवून आतापर्यंत त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह शंभरहून अधिक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली आहे. रुग्णालयातील एक सेविका व तिचा प्रियकर पोलिसांच्या हाती लागला आहे. परंतु या दोघांना अन्य चार ते पाचजणांची साथ असल्याचे स्पष्ट झाले आहे, पण पोलीस कारवाई टाळण्यासाठी या साथीदारांनी शहरातून पलायन केले आहे. त्यांचा शोध सुरूअसला तरी, अद्याप यश मिळाले नाही. हे साथीदार हाती लागल्यास कदाचित तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे. इस्लामपूर शहर परिसरात या खुनाविषयी वेगवेगळ््या अफवा पसरविल्या जात आहेत. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रेही एकाच्या घरात सापडली आहेत, परंतु याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. आ. जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात दुहेरी खून व तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे पोलीस यंत्रणा हादरली आहे. घटनेदिवशी (शनिवारी) रात्री दहापर्यंत संशयित सेविका कामावर होती. तिने रात्री दहा वाजता कामावरून सुट्टी करून घेतली. रात्रपाळीसाठी दुसरी सेविका कामावर रुजू झाली. त्यावेळी ‘डॉक्टर आजारी आहेत, ते झोपले आहेत, त्यांना कोणीही त्रास देऊ नका’, असे सांगून संशयित सेविका रुग्णालयातून बाहेर पडली होती, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता हीच संशयित सेविका नेहमीप्रमाणे कामावर आली आणि तिनेच डॉक्टर घराचा दरवाजा उघडत नसल्यानंतर आरडाओरडा केला. त्यानंतर दुहेरी खुनाचा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी) डॉक्टर कुलकर्णी यांची बदनामी होऊ नये, यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात आहे. खंडणीसाठी डॉक्टर दाम्पत्याचा खून झाल्याचे दाखविण्याच्या हालचाली सुरू आहेत. खुनाचे कारण निष्पन्न झाले आहे. संशयितांची नावेही रेकॉर्डवर आली आहेत. पण या प्रकरणाची ‘मूळ स्टोरी’ बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याने या तपासाला विलंब लागत असल्याची चर्चा आहे. आणखी दोघे ताब्यात डॉक्टरांच्या दुहेरी खूनप्रकरणी शहरातील आणखी दोघांना शनिवारी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका प्लंबर व्यावसायिकाचा समावेश आहे. या दोघांनी कोयत्यासह अन्य शस्त्रांची जुळवाजुळव केल्याचे चौकशीतून समोर येत आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी सुरू होती. पण पोलिसांनी त्यांची नावे सांगण्यास नकार दिला.