शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भिवर्गीत बेसुमार वाळू उपशाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 29, 2017 00:09 IST

भिवर्गीत बेसुमार वाळू उपशाकडे दुर्लक्ष

ओढापात्राची चाळण : कर्नाटकात वाळू पार्सल; महसूल विभागाकडून छापे टाकण्याचे नाटकसंख : महसूल विभाग, उमदी पोलिस ठाणे यांच्या दुर्लक्षाने जत तालुक्यातील भिवर्गी ओढापात्रात बेकायदेशीर वाळू उपसा रात्रं-दिवस राजरोसपणे सुरू आहे. ओढापात्रात मोठेमोठे खड्डे पडले आहेत. कर्नाटकात ही वाळू पार्सल केली जात आहे. वाळू तस्करीमधून लाखो रुपयांचा मलिदा गोळा केला जात आहे. महसूल विभागाकडून छापे टाकले जात आहेत, पण वाळू पकडून जुजबी दंड करून, चिरीमिरी घेऊन सोडले जात आहे. काहीवेळा अगोदर छापे पडणार असल्याची सूचना दिली जात आहे. त्यामुळे वाळू वाहने सापडत नाहीत. वाळू तस्करीमुळे काळ्या सोन्याचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी लक्ष घालून वाळू तस्करी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. पूर्व भागातील भिवर्गी गावची लोकसंख्या चार हजार आहे. गावाजवळ ओढा असून, पात्र मोठे आहे. ओढापात्रातून बांधकामासाठी वाळू मिळते. त्यामुळे वाळू तस्करीचा धंदा जोमात सुरू आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षाने ओढापात्रातून सुमारे ५० ट्रॅक्टरने वाळू तस्करी केली जात आहे. कमी कालावधित जास्त पैसा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. कर्नाटकमध्ये वाळूला जास्त मागणी आहे. कर्नाटकची हद्द जवळ असल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू तस्करी केली जाते. मजुरांकडून ट्रॅक्टरमध्ये चाळण लावून वाळू भरली जाते. त्या वाळूचे कर्नाटकमध्ये किंवा शेतामध्ये डेपो मारले जातात. मजूर गाडी भरण्यासाठी २५० ते ३०० रुपये घेतात. डिझेल, मजुरी, ड्रायव्हरचा पगार वजा जाता एका खेपेला ट्रॅक्टरला १२०० ते १५०० रुपये राहतात, तर टिपरला ५ ते ७ हजार रुपये राहतात. ट्रॅक्टरच्या खेपेला दोन हजार ते अडीच हजार रुपये, तर टिपरला ८ ते १० हजार रुपये मिळतात. त्यामुळे हा व्यवसाय सोन्याची अंडी देणारा व्यवसाय आहे.या व्यवसायात गावपुढारी, स्थानिक नेत्यांचा मोठा सहभाग आहे. आज प्रत्येकजण या व्यवसायाकडे आकर्षिला जात आहे. काहीजणांनी वाळूसाठी ट्रॅक्टर, जेसीबी आणले आहेत. महिन्यावर ठरवून ट्रॅक्टर आणलेले आहेत. पै-पाहुणे, नातेवाईकांची वाहने गुंतविलेली आहेत. त्यामुळे वाळू व्यवसायाची व्याप्ती वाढलेली आहे. (वार्ताहर)पाण्याची पातळी खालावणारबेकायदेशीर वाळू उपशामुळे हजारो वर्षांचा असणारा भूगर्भातील खजिना संपुष्टात येणार आहे. ओढा-पात्रात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता बारीक रेतीच्या वाळूमध्ये आहे. वाळूने भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवली जात होती. विहीर, कूपनलिकांना याचा फायदा होत होता. वारेमाप वाळू उपसा केला जात असल्याने याचा मोठा परिणाम पाणी पातळीवर होणार आहे. त्यामुळे सध्या पाण्याची पातळी ६०० ते ७०० फुटांपर्यंत गेली आहे.