शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंगच्या धान्यासाठी लाभार्थ्याच्या ठशांची सक्ती नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST

सांगली : कोरोनाचा संसर्ग संपेपर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांच्या बोटांच्या ठशांद्वारे धान्य वितरणास परवानगीची मागणी रेशनिंग फेडरेशनने केली आहे. ठशांमुळे ...

सांगली : कोरोनाचा संसर्ग संपेपर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांच्या बोटांच्या ठशांद्वारे धान्य वितरणास परवानगीची मागणी रेशनिंग फेडरेशनने केली आहे. ठशांमुळे कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्र्यांना संघटनेने निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, शिधापत्रिकाधारकाला धान्य घेण्यासाठी पॉस यंत्रावर बोटांचा ठसा उठवावा लागतो. सध्या कोरोनाच्या काळात ही प्रक्रिया सर्वांसाठीच धोकादायक आहे. पाॅस यंत्राच्या वापरातून व ठशांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी ग्राहकाचे ठसे घेण्याची सक्ती कोरोना काळापुरती रद्द करावी.

केंद्र शासन व राज्य शासन सर्वसामान्यांना जगविण्यासाठी धान्य वाटप करीत आहे, त्याच पद्धतीने रास्त भाव धान्य दुकानदारांनाही जगविण्याची जबाबदारी सरकारनेच घेतली पाहिजे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत धान्य वितरण करणाऱ्या अनेक दुकानदारांना कोरोनाचा संसर्ग झाला, राज्यभरात १०० हून अधिक दुकानदार दगावले. तरीही जिवाची पर्वा न करता धान्याचे वाटप सुरू ठेवले होते. मृत्यू झालेल्या दुकानदारांच्या वारसांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.

सध्याची कोरोनाची लाट अधिक तीव्र आणि गंभीर आहे. या काळात दुकानदारांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले शिधापत्रिकाधारक धान्य घेण्यासाठी येतात. त्यांच्यापासून दुकानदारांनाही संसर्गाची भीती आहे. पॉस यंत्रावर बोटांचे ठसे उमटविल्याने अन्य ग्राहकांनाही संसर्ग होऊ शकतो. हे लक्षात घेता कोरोनाची लाट संपेपर्यंत ग्राहकांच्या ठशांची सक्ती रद्द करावी. दुकानदाराचाच ठसा वापरून धान्य वितरणासाठी परवानगी द्यावी.

फेडरेशनचे सांगली जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, उपाध्यक्ष प्रभाकर कुरळपकर, शहराध्यक्ष रमजान बागवान, सचिव जयसिंग देसाई, आदींना निवेदन पाठविले.