शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

गुन्हेगारांना पकडू नका, फक्त त्यांची माहिती द्या!

By admin | Updated: July 8, 2014 00:49 IST

दिलीप सावंत : ‘रिक्षावाला खबरी’ उपक्रमास सांगलीत प्रारंभ

सांगली : रस्त्यावर तुम्ही व्यवसायानिमित्ताने २४ तास असता, कुठे काय घडले आहे, याची माहिती तुम्हाला असते. अगदी एखादी घटना तुमच्यासमोरही घडते. घटना होताना शेकडोजण पहात उभे असतात मात्र पोलिसांना कोणी कळवत नाही. यामुळे गुन्हेगारी फोफावत आहे. तुम्ही गुन्हेगारांना पकडू नका, केवळ आम्हाला माहिती द्या, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सांगली, मिरजेतील रिक्षाचालकांना केले आहे. घरफोडी, साखळी चोरी या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच रस्त्यावर होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती रिक्षाचालकांना पटकन समजते. त्यांची मदत झाली, तर गुन्हेगारीला आळा बसू शकतो, असा विचार करून सावंत यांनी रिक्षाचालकांना खबरी म्हणून घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात आजपासून (सोमवार) सुरू झाली. यानिमित्त पोलीस मुख्यालयात बैठक झाली. त्यावेळी सावंत बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, बजरंग बनसोडे, निरीक्षक संजय गोर्ले, रिक्षाचालक महादेव पवार, फिरोज मुल्ला, शाहीर खराडे, अरुण धनवडे उपस्थित होते.सावंत म्हणाले, रिक्षाचालकांना कोणत्या चौकात काय भानगडी सुरू आहेत, याची माहिती असते. महिलांच्या गळ्यातील दागिने भरदिवसा हिसडा मारुन लंपास केले जातात. उद्या तुमच्या घरातील महिलांवर असा प्रसंग येऊ शकतो. दागिने लंपास करणारे गुन्हेगार नंबरप्लेट नसलेल्या वाहनांचा वापर करतात, अशी नंबर प्लेट नसलेली वाहने दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. रस्त्यावर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या गुन्हेगारीची माहिती द्यावी. मात्र घटना घडत असताना आम्ही तिथे नसतो. तुम्ही असता. यामुळे तुमची मदत हवीय. चांगले काम करणाऱ्या रिक्षाचालकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येईल. (प्रतिनिधी)