शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील दिव्यांग शिंदे दाम्पत्य बनले परस्परांचा प्राणवायू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

सांगलीतील आनंदा व रंजना शिंदे या दिव्यांग दाम्पत्याने परस्परांना विश्वास देत कोरोनाला धोबीपछाड दिली लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ...

सांगलीतील आनंदा व रंजना शिंदे या दिव्यांग दाम्पत्याने परस्परांना विश्वास देत कोरोनाला धोबीपछाड दिली

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पुण्यातल्या रस्त्यांवर कंदील घेऊन निघालेल्या अंधाची गोष्ट बरीच प्रसिद्ध आहे. मी नेत्रहीन असलो तरी कंदिलामुळे इतरांना माझ्या अस्तित्वाची जाणीव व्हावी, असा हेतू असल्याचे या अंधाचे स्पष्टीकरण होते. सांगली यशवंतनगरमधील दत्तनगरमध्ये राहणाऱ्या आनंदा लक्ष्मण शिंदे (वय ७३ ) यांनीही कोरोनामध्ये अशीच प्रेरणादायी भूमिका बजावली.

शिंदे कोरोनाबाधित झाले; पण अंधपणामुळे इतरांपासून संपर्क टाळणे शंभर टक्के शक्य नव्हते. अजानतेपेणी कोणीतरी संपर्कात यायचे. हे लक्षात घेऊन शेजाऱ्यापाजाऱ्यांना स्पष्टपणे कोरोनाबाधेची माहिती दिली. लपवून ठेवण्याने संसर्ग फैलावून अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत, अशा काळात शिंदे यांनी स्वत:च इतरांना सावध केले. वसंतदादा कारखान्यातील ३६ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच देवी रोगामुळे दृष्टी गेली आहे. सध्या मधुमेहदेखील आहे. पत्नी रंजना (वय ६७) जन्मत:च दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत.

११ मे रोजी दोघेही कोरोनाबाधित झाल्याचा रिपोर्ट आला. उघड्या डोळ्यांनी कोरोनाचा हाहाकार पाहणारे बाधित होताच हादरून जातात; पण शिंदे दाम्पत्याने सकारात्मकतेने कोरोना स्वीकारला. स्वत:पासून अंतर राखण्याची विनंती सर्वांना केली. डॉक्टरांच्या सूचनांनुसार घरातच उपचार सुरू झाले. मुलगा संजय व सून वासंती देखभाल करायचे; पण दुर्दैवाने तेदेखील बाधित झाले.

अशावेळी मदतीसाठी मित्र धावले. दैनंदिन वस्तू घरपोच दिल्या. माहेश्वरी युवा मंचानेही हात दिला. यादरम्यान मुलगा व सून कोरोनामुक्त झाले. शिंदे दाम्पत्यानेही मात केली.

चौकट

परस्परांना दिला विश्वास

दिव्यांग शिंदे दाम्पत्याने परस्परांना विश्वास देत प्रकृती स्थिर ठेवली. अैाषधोपचार, आहार, आरोग्यदायी जीवनशैलीचे डॉक्टरांच्या सूचनांनुसार काटेकोर पालन केले. महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास हरवू दिला नाही. त्यामुळे दोन आठवड्यांच्या विलगीकरण काळात त्यांचा ऑक्सिजन स्थिर राहिला. दिव्यांगपणामुळे त्यांचे संपूर्ण सहजीवनच एकमेकांच्या मदतीने सुरू होते, कोरोनाकाळातही हातातला हात सुटू दिला नाही. हा विश्वास परस्परांचा प्राणवायू ठरला आणि कोरोनानेही अखेर माघार घेतली.