शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग रूपाली... अपंग यंत्रणा अन् निराधार जगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा (जि. सांगली) : जन्मत:च नशिबाने टाकलेले उलटे फासे तिच्या आयुष्याच्या प्रवासात कधी सुलटे झालेच नाहीत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा (जि. सांगली) : जन्मत:च नशिबाने टाकलेले उलटे फासे तिच्या आयुष्याच्या प्रवासात कधी सुलटे झालेच नाहीत. तिच्या शारीरिक दिव्यांगाला पदोपदी अडचणींच्या काटेरी मार्गावरून चालावे लागले. ७६ टक्के अपंगत्व असतानाही अधू असलेल्या शासकीय यंत्रणेमुळे आजवर तिला दमडीचीही शासकीय मदत मिळू शकली नाही.

पाडळी (ता. शिराळा) येथील २७ वर्षीय दिव्यांग व मतिमंद असलेली रूपाली भगवान सोळसे जन्मत:च सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त आहे. उंची फक्त दोन फूट आहे. काेणतेही आधारकार्ड काढताना डाेळ्यांचे फाेटाे घेतले जातात. पण ७६ टक्के अपंग असलेल्या रूपालीच्या डोळ्याचे फोटो घेताना तिचे डोळे फिरतात. त्यामुळे आधारकार्ड निघत नाही. आधारकार्ड मिळाले नाही, त्यामुळे शासनाच्या कोणत्याही सवलतीचा फायदा मिळत नाही. मतदार यादीत नाव आहे; मात्र कोणतेही ओळखपत्र नसल्याने तिला मतदान करून दिले जात नाही.

साेळशे परिवाराचे मूळ गाव मसूद माले (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हे असून, भगवान सोळशे हे ४५ वर्षांपासून मामाच्या गावी म्हणजे पाडळी येथे आश्रयास आहेत. भगवान व सविता सोळशे यांना तीन मुली. यातील उज्ज्वला व दीपाली या दोन मुलींचे विवाह झाले आहेत. तिसरी मुलगी रूपाली. घरची गरिबी आणि त्यातच जन्मत:च सेरेब्रल पाल्सी व मतिमंद या आजाराने ग्रस्त असलेल्या रूपालीच्या जन्माने कुटुंबाला मानसिक धक्काच बसला. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असतानाही मोलमजुरी करीत या दिव्यांग मुलीस जिद्दीने सांभाळायचे काम हे कुटुंब नेटाने करत आहे. दिव्यांगांसाठी शासनाच्या असंख्य योजना असताना, केवळ आधारकार्ड नसल्याने रूपाली या योजनांपासून वंचित आहे.

उपचारासाठी पाच ते सहा लाख खर्च

दारिद्र्यरेषेखालील कुटुंब असूनही या मुलीला धान्य मिळत नाही. तिला नीट चालता येतही नाही. ही मुलगी रांगते. परिस्थिती नसतानाही आतापर्यंत ५ ते ६ लाख रुपये उपचारासाठी खर्च केले आहेत.