शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८७.९० टक्के

By admin | Updated: May 25, 2016 23:35 IST

निकालात मुलींनी मारली बाजी : शास्त्र शाखेचा सर्वाधिक निकाल; विशेष प्रावीण्यासह ३,३२६ उत्तीर्ण

सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात सांगली जिल्ह्याचा निकाल ८७.९० टक्के लागला असून दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप महाविद्यालयांमधून ३ जूनला दुपारी ३ वाजता होणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांचे प्रमाण ८३.५५ टक्के, तर मुलींचे प्रमाण ९३.५८ टक्के असे आहे. दरम्यान, आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी बुधवारी दुपारपासून नेट कॅफेवर गर्दी झाली होती. यावर्षी फेबु्रवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यातील ३३ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, तर ३३ हजार ५७१ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेस बसले होते. यापैकी विशेष प्रावीण्यासह ३ हजार ३२६, प्रथम श्रेणीत १६ हजार ३३८, तर द्वितीय श्रेणीत २३ हजार २३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९४.७८ टक्के , कला शाखेचा निकाल ७८.६२ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९०.९९ टक्के लागला आहे. निकाल पाहण्यासाठी बुधवारी दुपारपासूनच विद्यार्थ्यांसह पालकांनी सांगली, मिरज शहरातील नेट कॅफेमध्ये गर्दी केली होती. निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अनेकांनी निकाल मोबाईलवर एसएमएसद्वारेच पाहिला. ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे कमी असले तरी, मोबाईलवर निकाल पाहता येत असल्याने तेथील विद्यार्थ्यांची सोय झाली. बुधवारी जाहीर झालेल्या निकालात जिल्ह्यातील १९ शाळांनी ‘शंभर नंबरी’ शाळा म्हणून बहुमान मिळवला आहे. कोल्हापूर विभागाच्या निकालाचा आढावा घेतला असता, त्यात सांगली जिल्ह्याने दुसरा क्रमांक मिळविला आहे. (प्रतिनिधी)शंभर नंबरी शाळाजिल्ह्यातील १९ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यात श्री. व्ही. लोणारी दादरे गुरूकुल उच्च माध्यमिक विद्यालय, रॉयल महात्मा पब्लिक स्कूल निगडी खुर्द (ता. जत), सोपे ज्युनिअर कॉलेज (जत), अंबिका मंडळ ज्युनिअर कॉलेज (कवठेमहांकाळ), नवकृष्णा व्हॅली ज्यु. कॉलेज (कुपवाड), श्री राजर्षी शाहू महाराज कॉलेज सांगली, जी. एस. कोठारी गुजराथी ज्यु. कॉलेज सांगली, न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्यु. कॉलेज शिराळा, श्री शिवछत्रपती महाविद्यालय शिराळा, न्यू इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेज भाळवणी (ता. खानापूर), किर्लोस्कर हायस्कूल व ज्यु. कॉलेज किर्लोस्करवाडी (पलूस), संस्कार गुरूकुल पलूस, गुरूदेव दादोजी कोंडदेव सैनिक शाळा तासगाव, अ‍ॅड. रावसाहेब रामराव पाटील ज्यु. कॉलेज तासगाव, इस्लामपूर हायस्कूल व कॉलेज (वाळवा), सागर पाटील कॉलेज ढवळी (वाळवा), के. बी. पाटील कॉलेज ऐतवडे (वाळवा), महात्मा गांधी महाविद्यालय इस्लामपूर (वाळवा) या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.