शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या रोखपाल, शिपायास अखेर अटक

By admin | Updated: January 28, 2015 00:54 IST

अपहार प्रकरण : कोठडीत रवानगी, एकजण अद्याप फरारी

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तुंग (ता. मिरज) येथील शाखेत अपहार केल्याप्रकरणी बँकेतील रोखपाल व शिपायास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. रोखपाल जमीर नसरुद्दीन सनदी (वय ४८) व शिपाई नंदकुमार रामचंद्र मोरे (४१, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली अनेक महिने ते फरारी होते. यातील लिपिक प्रतापराव पांडुरंग धनवडे (४१, बागणी, ता. वाळवा) हा अद्याप फरारी आहे. ग्राहकांनी बँकेत भरलेल्या पैशाच्या नोंदी रेकॉर्डवर न करता पैसे हडप केले होते. सोने गहाण कर्ज योजनेंतर्गत ग्राहकांनी दिलेल्या सोन्यावरही त्यांनी डल्ला मारला होता. ग्राहकांचे लॉकरमधील दागिने घेऊन त्याजागी त्यांनी बनावट दागिने ठेवले होते. यातून त्यांनी २६ लाख ४६ हजारांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी बँकेकडून चौकशी केली जात होती. चौकशीत अपहार झाल्याचे उघडकीस येताच रोखपाल जमीर सनदीसह तिघांविरुद्ध २४ सप्टेंबर २०१४ रोजी सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. २४ जुलै ते २ आॅगस्ट २०१४ या कालवधित त्यांनी अपहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कारवाई टाळण्यासाठी संशयित फरारी झाले होते. यातील सनदी याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने जामीन फेटाळताच त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही जामीन फेटाळला. आठवड्यापूर्वी त्याला अटक केली होती. त्यास पोलीस कोठडीही मिळाली होती. तपासानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. शिपाई मोरे हा २१ जानेवारीला थेट न्यायालयात शरण आल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. सध्या तो उद्यापर्यंत (बुधवार) पोलीस कोठडीत आहे. (प्रतिनिधी)