शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला १२७ कोटीचा ढोबळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

सांगली : शेतकरी कर्जमाफी आणि कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा बॅँकेने उत्कृष्ट काम केल्याने राज्यातील पहिल्या तीन जिल्हा बँकांमध्ये समावेश ...

सांगली : शेतकरी कर्जमाफी आणि कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा बॅँकेने उत्कृष्ट काम केल्याने राज्यातील पहिल्या तीन जिल्हा बँकांमध्ये समावेश झाला आहे. या वर्षात १२७ कोटी ४७ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष दिलीपतात्या पाटील व उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. वर्षअखेर १२ हजार कोटीपर्यंत व्यवसाय गेला आहे.

पाटील म्हणाले की, बँकेच्या भागभांडवलात गतवर्षीपेक्षा ७.५३ टक्के वाढ आहे. मागील वर्षी ५८०० कोटी ८२ लाख ९३ हजाराच्या ठेवी होत्या. यंदा यात १०.७३ टक्के वाढ होऊन ठेवी ६४२३ कोटी ५४ लाख ७६ हजारापर्यंत गेल्या आहेत. बाहेरील कर्जे २७.१ टक्के वाढीव घेतली आहेत. ही रक्कम ८३१ कोटी ५२ लाख आहे. गुंतवणुकीत १३.८९ टक्के घसरण झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी ११४२ कोटी रुपयांची कर्जे जादा दिली आहे. एकूण ५३५६ कोटी ८४ लाख कर्जाचे वाटप केले आहे. १२७ कोटी ४७ लाखाचा ढोबळ नफा झाला आहे. गतवर्षीपेक्षा ३७.९७ टक्के वाढ आहे. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची वसुली कमी झाली आहे. कोरोनाचा बॅँकेच्या नफ्यावर परिणाम झाला आहे.

उपाध्यक्ष देशमुख म्हणाले, बँकेच्या प्रतिकर्मचारी व्यवसायात यंदा २१.३६ टक्के वाढ झाली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने एक कोटी ६० लाखांचा व्यवसाय केला आहे. एनपीएचे प्रमाण ११.९४ टक्केवरून ११.९८ टक्के झाले आहे. एकूण व्यवसाय १२ हजार कोटीपर्यंत झाला आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील, सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग, जे. जे. पाटील उपस्थित होते.

चौकट

लवकरच पहिल्या क्रमांकावर

जिल्हा बँकेने केलेल्या चांगल्या कारभारामुळे सध्या बँकेचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. बँक कार्पोरेट पध्दतीने चालविण्याचा प्रयत्न आहे. काहींची थकबाकी वसूल झाली की, बँक राज्यात पहिल्या क्रमांकावर जाईल, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.