शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांच्या नोकर भरतीस लवकरच मान्यता मिळणार

By admin | Updated: June 28, 2016 00:44 IST

मुंबईत बैठक : व्याजदरातील तोटा कमी करण्याची मागणी

सांगली : राज्यातील जिल्हा बॅँकांच्या प्रलंबित नोकरभरती प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन सोमवारी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले. त्याचबरोबर जिल्हा बॅँकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी येत्या काही दिवसात शासन महत्त्वाचे निर्णय घेईल, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यातील १४ जिल्हा बॅँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी संचालकांची बैठक राज्य सहकारी बॅँकेत पार पडली. अध्यक्षस्थानी चंद्रकांत पाटील होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, नाबार्डचे विजय चांदेकर उपस्थित होते. जिल्हा बॅँकांच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक समस्या मांडल्या. नोकरभरतीचा प्रश्न प्राधान्याने मांडण्यात आला. जिल्हा बॅँका सध्या कमी कर्मचाऱ्यांवर काम करीत आहेत. त्यामुळे कामकाजात अनेक अडचणी येत आहेत. यावर सहकार आयुक्त म्हणाले की, जवळपास १0 ते ११ बॅँकांचे नोकर भरतीचे प्रस्ताव सादर झालेले आहेत. नोकर भरतीचा प्रश्न सोडविताना बॅँकांच्या आर्थिक परिस्थितीचा व सक्षमतेचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार नोकर भरतीला प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय ज्या बॅँकांनी नोकरभरती केलेली आहे, त्यांनी नवीन आकृतीबंधानुसार मान्यता घ्यावी, अशी सूचना त्यांनी दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, जिल्हा बॅँका या सर्वसामान्यांसाठी असल्याने त्या चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत, अशी शासनाची भूमिका आहे. त्याच माध्यमातून काही सकारात्मक निर्णय जिल्हा बॅँकांबाबत झालेले आहेत. यापुढेही असेच सकारात्मक निर्णय होतील. जे प्रश्न बॅँक पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मांडले, त्यांचा विचार होऊन त्याबाबत तातडीने निर्णय घेतले जातील. सांगली जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी कृषी कर्जपुरवठ्यातील तोट्याचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, जिल्हा बॅँकांकडून केल्या जाणाऱ्या शेती कर्जपुरवठ्यात सध्या २ टक्के तोटा होत आहे. याची एकूण रक्कम २0 ते ३0 कोटी रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी नाबार्ड किंवा शासनाने बॅँकांना मदत करावी. सध्या सर्वच जिल्हा बॅँकांमध्ये अपुऱ्या संख्याबळाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोसायटी सचिवांच्या नियुक्तीस शासनाची परवानगी नाही. त्यामुळे सध्या एका सचिवाला ३ ते ४ शाखांचा कारभार पाहावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक सोसायटीला सचिव नियुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली. दळवी यांनी, याबाबत बॅँकांच्या श्रेणीनुसार निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. आयकर कमी करा - दिलीपतात्या पाटीलदिलीपतात्या पाटील यावेळी म्हणाले की, जिल्हा बँका या सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्था आहेत. त्यामुळे त्यांना आयकरात सवलत मिळावी. सध्या नफ्यावर ३0 टक्के आयकर लागू आहे. तो शासनाने कमी करावा. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये व बचत गटांचे मानधन जिल्हा बँकांच्या माध्यमातून वितरित व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आयुक्तांनी, सक्षम बँकांसाठी असा निर्णय घेण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.