शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचे संचालक मुदतवाढीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

सांगली : सांगलीसह जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव गेल्या दीड महिन्यापासून शासनाकडे प्रलंबित आहे. या काळात मुदतवाढ नसतानाही ...

सांगली : सांगलीसह जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव गेल्या दीड महिन्यापासून शासनाकडे प्रलंबित आहे. या काळात मुदतवाढ नसतानाही बाजार समित्यांच्या वाहनांसह कार्यालयाचा वापर सुरू आहे. शासनाने मुदतवाढ नाकारून प्रशासक नियुक्त केल्यास संचालक मंडळाचा खर्च वसूल करावा लागेल, अशी परिस्थिती आहे.

सांगली बाजार समिती संचालक मंडळाची मुदत २६ फेब्रुवारी रोजी संपली आहे. तासगाव, पलूस, वाळवा या बाजार समितीच्या संचालक मंडळाचीही मुदत संपली आहे. मुदतवाढीबाबत राज्य शासनाने कोणताच निर्णय घेतलेला नाही. शेतकरी संघटना सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली आहे. मुदतवाढ नसताना दीड महिना संचालक बाजार समितीचा कारभार कसे करू शकतात, असा मुद्दा उपस्थित केला आहे. यावर पणन संचालक सतीश सोनी यांनी, मुदतवाढीचा कालावधी संपल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे उत्तर दिले आहे. यामुळे संचालक मंडळाच्या मुदतवाढीमागे नक्की काय आहे, हेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना समजेनासे झाले आहे. दरम्यान, संचालक मंडळही शासन आदेशाच्या प्रतीक्षेत आहे.

चौकट

सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित : दिनकर पाटील

मागील मंगळवारी मुदतवाढीच्या प्रस्तावावर निर्णय अपेक्षित होता. पण, निर्णय झाला नाही. केवळ सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची सही राहिल्यामुळे मुदतवाढीचा आदेश आलेला नाही. सोमवार, १२ एप्रिलपर्यंत मुदतवाढीचा आदेश मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले.

चौकट

बाजार समित्यांबाबत डीडीआरनेच निर्णय घ्यावा : संजय कोले

सांगलीसह जिल्ह्यातील सर्वच संचालक मंडळांची मुदतवाढ फेब्रुवारी महिन्यात संपली आहे. तरीही या संचालकांना शासनाकडून दुसऱ्या टप्प्यातील मुदतवाढीबद्दल कोणताच निर्णय घेतला नाही. याबाबत पणनचे पुणे येथील संचालक सतीश सोनी यांच्याशी शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी शुक्रवारी संपर्क साधला होता. या वेळी सोनी त्यांना म्हणाले की, बाजार समित्यांची मुदतवाढ संपल्यानंतर त्यावर जिल्हा उपनिबंधकांनीच निर्णय घेणे अपेक्षित आहे. यामुळे तुम्ही जिल्हा उपनिबंधकांनाच मुदतवाढीबद्दल विचारा. तेच योग्य उत्तर देतील.