शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

डिप्लोमा प्रवेश यंदा हाऊसफुल्ल होण्याची शक्यता, दहावीच्या बंपर निकालाचा पॉलिटेक्निकना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पदविका अभियांत्रिकी प्रवेशाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद यावर्षी अतिशय चांगला आहे. शासकीय तंत्रनिकेतनमधील सर्व जागा भरतील, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पदविका अभियांत्रिकी प्रवेशाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद यावर्षी अतिशय चांगला आहे. शासकीय तंत्रनिकेतनमधील सर्व जागा भरतील, असा विश्वास प्रशासनाला आहे. खासगी महाविद्यालयांत सुमारे ८० टक्के जागांसाठी विद्यार्थी मिळण्याचा अंदाज आहे.

यंदा दहावीचा बंपर निकाल लागल्याने डिप्लोमादेखील हाऊलफुल्ल होण्याची अपेक्षा आहे. डिग्रीपेक्षा डिप्लोमानंतर नोकरी किंवा रोजगाराची हमी जास्त असल्यानेही विद्यार्थ्यांचा डिप्लोमाकडे कल दिसून येत आहे. सध्या पहिली फेरी पूर्ण होत आली असून, अडीच हजार विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरले आहेत. याबाबतीत सांगली जिल्हा पुणे विभागात पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या फेरीची यादी शनिवारी (दि.१८) प्रसिद्ध होईल. अनेक विद्यार्थी दुसऱ्या फेरीला प्रवेश अर्ज भरतात, त्यामुळे विद्यार्थी संख्या आणखी वाढणार आहे.

बॉक्स

विद्यार्थ्यांचा कल आयटीकडे

विद्यार्थ्यांचा कल आयटी क्षेत्राकडे असल्याचे पसंतीक्रमानुसार दिसते. कॉम्प्युटर, इलेक्ट्रिक, केमिकल, मेकॅनिकल या विद्याशाखांकडे विद्यार्थ्यांची गर्दी जास्त आहे.

कोट

नोकरी किंवा स्वयंरोजगाराची हमी

डिप्लोमानंतर नोकरी किंवा स्वयंरोजगाराची हमी वाटते. प्रवेश अर्जात मेकॅनिकलचा पसंतीक्रम नोंदविला आहे. जागा जास्त असल्याने प्रवेश मिळेल याचीही खात्री आहे. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर काही कोल्हापूर, पुण्यात नोकरीची संधी नक्की मिळेल.

- रोहन वायदंडे, विद्यार्थी

माझ्या वर्गमित्रांनी डिप्लोमासाठी प्रवेशअर्ज भरले आहेत. शहरातील जवळचे महाविद्यालय प्रवेशासाठी निवडले आहे. तेथे प्रवेश मिळाल्यास डिप्लोमाला प्रवेश निश्चित करेन. कॉम्प्युटर शाखेला पसंती दिली आहे. भविष्यात आयटी क्षेत्राला संधी असल्याने पसंती दिली आहे.

- अमोल सरवदे, विद्यार्थी

कोट

यावर्षी सर्व जागा भरतील

यावर्षी दहावीचा निकाल अतिशय चांगला लागला आहे, त्यामुळे डिप्लोमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. गेल्यावर्षीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी डिप्लोमाला पसंती दिली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय महाविद्यालयांतील जागा निश्चित भरतील. खासगी महाविद्यालयांत ८० टक्क्यांहून अधिक जागा भरण्याची अपेक्षा आहे. सध्या पहिली फेरी सुरू आहे. पुढील फेऱ्यांत आणखी प्रवेशअर्ज येतील. अकरावी व बारावीचा शैक्षणिक खर्च, शिकवणी वर्गांची मोठी फी यामुळेही विद्यार्थी डिप्लोमाकडे वळले आहेत.

- प्राचार्य नितीन सोनजे, नोडल ऑफिसर, शासकीय तंत्रनिकेतन, मिरज

पॉईंटर्स

जिल्ह्यातील प्रवेश क्षमता

एकूण पॉलिटेक्निक महाविद्यालये - १४

एकूण प्रवेश क्षमता - ३०००

प्रवेश अर्ज - २५००

पॉलिटेक्निक महाविद्यालये

शासकीय - ३

खासगी - ११

महाविद्यालय प्रवेश क्षमता

शासकीय ११०८

खासगी १८९२