शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धनगर समाजाचे आंदोलन

By admin | Updated: July 31, 2014 00:05 IST

सांगलीत मोर्चा : इस्लामपुरात गुरुवारी बंदची हाक; लांडगेवाडी फाट्यावर रास्ता रोको

इस्लामपूर/शिरढोण/आष्टा/कडेगाव : बुधवारी धनगर समाजबांधवांनी मेंढरांच्या कळपासह ‘जय मल्हार’च्या गजरात इस्लामपूर तहसील कार्यालयावर धडक मारली. आरक्षण व सवलतींसाठी अत्यंत आक्रमक झालेल्या धनगर समाजाने आघाडी सरकारला हिसका दाखविण्याचा इशारा दिला. दरम्यान, या मागणीसाठी उद्या (गुरुवारी) इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली आहे. शिरढोण येथे रास्ता रोको, आष्टा, कडेगाव येथे मोर्चा काढून शासनाचा निषेध केला.धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अमित मलगुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात महिला—मुलींसह समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. पेठ—सांगली राज्यमार्गावर ठिय्या मारत दोन तास आंदोलन चालले. मोर्चाला भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, मराठा महासंघ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला.सुनील मलगुंडे, अमित मलगुंडे, बापू बिरु वाटेगावकर, चंद्रशेखर तांदळे, प्रदीप गावडे, श्रध्दा करे, अजित हराळे, विजय जाधव यांची भाषणे झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. पाटील यांनी धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी काँग्रेसचे जितेंद्र पाटील, राजेंद्र शिंदे, अ‍ॅड. आर. आर. पाटील, विजय पवार, स्वाभिमानीचे बी. जी. पाटील, सयाजी मोरे यांच्यासह अशोकराव वीरकर, संभाजी कचरे, नगरसेविका शुभांगी शेळके, शालन कोळेकर, पं. स. सदस्या रेखा कोळेकर, कविता ताटे उपस्थित होते.शिरढोण : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मिरज—पंढरपूर रस्त्यावर लांडगेवाडी फाटा येथे आज (बुधवार) दुपारी एकच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे,तुकाराम मासाळ, बिरदेव बंडगर, सावंता पांढरे, अनिल पाटील, शरद शेळके, सचिन पाटील, अर्जुन थोरात, लक्ष्मण रनवरे, सूरज पाटील आदींची भाषणे झाली. आंदोलनात आबासाहेब ओलेकर, भाऊसाहेब दुधाळ, आशितोष शेजाळ, शिवाजी पाटील, दादासाहेब कोळेकर, प्रताप एडके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)