शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धार; आत्महत्यांचा दूर विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:27 IST

सांगली : कोरोनाचे वादळ आणि लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणींचा ताकदीने सामना करीत त्याविरोधात लढण्याचा निर्धार लोकांमध्ये वाढत आहे. त्यामुळेच २०१८ ...

सांगली : कोरोनाचे वादळ आणि लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणींचा ताकदीने सामना करीत त्याविरोधात लढण्याचा निर्धार लोकांमध्ये वाढत आहे. त्यामुळेच २०१८ व २०१९ च्या तुलनेत कोरोनाच्या काळात आत्महत्येच्या प्रमाणात तब्बल ८ टक्क्यांनी घट झाली आहे.

सांगली जिल्ह्यात गेली वर्षभर कोरोनाचा कहर सुरू आहे. या काळात लॉकडाऊनमुळे महामंदीचे चटके हजारो लोकांना सोसावे लागले; पण या चटक्यांपेक्षा जगणे व कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची मानून अनेकांनी लढण्याचा निर्धार केला. त्याचेच सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत. कोरोनाच्या संकटकाळातही जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत या संकटामुळे आत्महत्येच्या मोजक्या घटना घडल्या, मात्र त्यानंतर सामाजिक संस्था, जिल्हा प्रशासन व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सकारात्मक विचार ठेवण्यासाठी जनजागृती केल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून आले.

चौकट

अशी आहे आत्महत्येची आकडेवारी

२०१८ ५९५

२०१९ ६१६

२०२० ५६७

चौकट

जीव माझा मोलाचा, आधार मी कुटुंबाचा

मिरजेतील मानसोपचारतज्ज्ञ चंद्रशेखर हळिंगळे यांनी सांगितले की, कोरोनाने अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या. ज्यांना लॉकडाऊनमुळे घरात बसावे लागले त्यांना धावाधाव न करताही, कमी खर्चातही चांगले जगता येऊ शकते याची जाणीव झाली.

बाहेरचा ताण कमी होऊन कुटुंबाचे सुख, त्यांचे पाठबळ लाभल्यानेही लोकांचे मनोबल वाढले. सकारात्मक विचाराकडे त्यांची पावले पडली. जीव मोलाचा आहे व कुटुंबाला आपला आधार आहे, याचीही जाणीव प्रबळ झाली.

लोक व्यायाम करू लागल्याने त्यांचे शरीर व मनाचे आरोग्यही चांगले झाले

व्यसनांच्या आहारी जाऊन होणाऱ्या आत्महत्याही थांबल्या.

चौकट

कोरोनामुळे झालेल्या आत्महत्येने कार्यकर्ते हादरले

जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी मिरज तालुक्यातील दुधगाव येथे एकाने कोरोनाच्या उपचाराचे पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली होती. या घटनेने जिल्हा हादरला. सामाजिक कार्यकर्त्यांनी कुटुंबाला मदत करतानाच अशा घटना घडू नयेत म्हणून जनजागृती केली. जून २०२० मध्ये आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे एकाने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली. सप्टेंबर २०२० मध्ये सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाने गळ्यावर धारधार चाकूने वार करून आत्महत्या केली. अशा सुमारे १० घटना जिल्ह्यात कोरोना काळात घडल्या.