नाशिक : महापालिकेला गेल्या सहा महिन्यांपासून आयुक्त नसला, तरी राज्य शासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त म्हणून समीर उन्हाळे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका आयुक्त संजय खंदारे यांची बदली करण्यात आली. तेव्हापासून आजवर पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती झालेली नाही. दरम्यानच्या काळात अतिरिक्त आयुक्तपदासाठी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरू होते. तथापि, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, त्यामुळे आता पुढील महिन्याच्या अखेरीस पालिकेला पूर्णवेळ आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त मिळतील अशी शक्यता होती; परंतु आता राज्य शासनाने एमएमआरडीएमध्ये नियुक्त असलेले समीर उन्हाळे यांची नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार गॅसवर
By admin | Updated: September 19, 2014 00:12 IST