शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौर, भाजप अशांत; मदनभाऊ गट मात्र शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

सांगली : महापालिकेच्या अर्थसंकल्पातील निधीवरून उपमहापौर उमेश पाटील, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशींसह राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडीत गाठले आहे. पण ...

सांगली : महापालिकेच्या अर्थसंकल्पातील निधीवरून उपमहापौर उमेश पाटील, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशींसह राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडीत गाठले आहे. पण या वादात काँग्रेसमधील मदनभाऊ गट मात्र शांतच आहे. चौमाही बजेटमध्ये वाढीव तरतुदीचे गाजर महापौरांनी दाखविले आहे. तोपर्यंत उपमहापौर वाट पाहणार का? असा प्रश्न आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना वाढीव ४० लाखांचा स्थानिक निधी देण्यात आला. तर भाजप नगरसेवकांसाठी केवळ २५ लाखांची तरतूद करण्यात आली. यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. महासभा चालू न देण्याचा इशाराही भाजपकडून देण्यात आला. त्यावर सत्ताधारी राष्ट्रवादीने शंभर कोटींच्या निधीवाटपाचा मुद्दा उपस्थित करीत भाजपवर पलटवार केला. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला असतानाच उपमहापौर पाटील यांनी या वादात उडी घेतली. वसंतदादा स्मारक स्थळाच्या विकासासाठी त्यांनी एक कोटीची मागणी केली होती. पण महापौरांनी केवळ १० लाखांची तरतूद करून त्यांच्या पत्राला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. राष्ट्रवादीकडून उपमहापौरांची समजूत काढण्याचा जोरदार प्रयत्नही झाला.

महापौर सूर्यवंशी यांनी चौमाही बजेटमध्ये वसंतदादा स्मारकासाठी वाढीव निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले. पण हे आश्वासन केवळ गाजर ठरणार आहे. चौमाही बजेटला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत वसंतदादा स्मारकस्थळाच्या विकासासाठी वाट पाहावी लागणार आहे. जानेवारी महिन्यात निविदा काढून त्यानंतर काम सुरू होण्यास फेब्रुवारी महिना उजाडेल. आताच अर्थसंकल्पात तरतूद झाली असती तर निविदा काढून तातडीने काम सुरू झाले असते. त्यातच आयुक्तांनी अर्थसंकल्पातील ठराविक कामेच मार्गी लागतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे नगरसेवकांचा वाढीव निधी अथवा इतर कामांच्या पूर्ततेबाबत साशंकताच आहे.

या साऱ्या वादात काँग्रेसंतर्गत मदनभाऊ गट मात्र शांतच दिसत आहे. विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी अर्थसंकल्पातील तरतुदीबाबत जाहीर वाच्यता केलेली नाही. मदनभाऊ एकांकिका स्पर्धेच्या निधीतही कपात करण्यात आली आहे. पण त्यावर या गटाकडून कोणतेच भाष्य करण्यात आलेले नाही. उपमहापौर पाटील यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असल्याचे लंगडे समर्थन केले जात आहे.

चौकट

आम्ही उपमहापौरासोबत : साखळकर

याबाबत विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले की, वसंतदादा स्मारकाच्या विकासासाठी उपमहापौरांसह मीही महापौरांना पत्र दिले होते. हा उपमहापौरांनी हाती घेतला. त्याला आमचा पाठिंबा आहे. आमच्याकडील पत्राच्या प्रतिही उपमहापौरांना दिल्या आहेत. वसंतदादा स्मारकाबाबत आम्ही उपमहापौरासोबत आहोत, असे सांगितले.