शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षप्रेमींची पावले रोपवाटिकेकडे!

By admin | Updated: July 22, 2014 23:14 IST

आमराईही बहरणार : बोन्साय, सहा फुटी रोपांना वाढती मागणी

नरेंद्र रानडे - सांगली सांगली शहरातील विविध रोपवाटिकांच्या दिशेने सध्या वृक्षप्रेमींची पावले वळत आहेत. शोभेची झाडे, बोन्साय आणि परसबागेत लावण्यासाठी पाच ते सहा फुटी झाडांना वृक्षप्रेमी पसंती देत आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागानेदेखील आमराईमध्ये पुढील वर्षीसाठी पाच हजार रोपांची लागवड करण्यास प्रारंभ केला आहे.शहर परिसरात सुमारे दहा रोपवाटिका आहेत. त्या सर्वच रोपवाटिकांमधून नानाविध प्रकारची रोपे विक्रीस उपलब्ध आहेत. भर पावसातही आकर्षक रोपे घेण्यासाठी वृक्षप्रेमी गर्दी करत आहेत. सुमारे दोनशेवर शोभेची झाडे सध्या विक्रीस उपलब्ध आहेत. त्यापैकी मॅण्डेविला, अलमंडा, बदकवेल, रानजाई, कृष्णकमळ, गणेशवेल, संक्रांतवेल, इफोरबिया, टिकोमा, पेंटास, पिटोनिया आदी रोपांना मागणी आहे. बंगल्याभोवती लावण्यासाठी झुडूपवर्गीय एक्सोरा, फायकस, आरेका पाम, बांबू आदी रोपांची विक्री होत आहे. मागील वर्षापासून मोठ्या कुंडीमध्ये झाडे लावण्याकडे कल वाढत चालला आहे. साहजिकच पाच ते सहा फूट उंचीपर्यंतच्या रोपांना मागणी आहे. यामध्ये ताम्हण, बहावा, गुलमोहर, चाफा, कांचन, साठवण, बकुळी आदींचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी घराच्या सभागृहात लावण्यासाठी कॅक्टसची रोपे घेतली जात होती; परंतु सध्या मात्र कॅक्टसची मागणी अत्यंत कमी झाली आहे. त्याऐवजी इतरांच्या तुलनेत महाग असणाऱ्या आणि सुमारे शंभर वर्षे आयुष्य असणारी बोन्साय झाडे लावण्याकडे अनेकांचा कल आहे. भारतीय रोपांप्रमाणेच अ‍ॅडेनियम, टॅबुबिया, चाफा आदी विदेशी रोपेदेखील काही रोपवाटिकांमध्ये उपलब्ध आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे गुलमोहर, कांचन, रेन-ट्री आदी प्रकारच्या पाच हजार रोपांची आमराईत लागवड करण्यात येत आहे. यंदा १५०० रोपे विविध ठिकाणी लावण्यात आली आहेत.