शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

आशा व गटप्रवर्तकांची सांगलीत पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर उद्या निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST

सांगली : आशा कार्यकर्त्या व गटप्रवर्तक १५ जूनपासून बेमुदत संपावर आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी शासनाने समाधानकारक तोडगा न काढल्याने आंदोलन ...

सांगली : आशा कार्यकर्त्या व गटप्रवर्तक १५ जूनपासून बेमुदत संपावर आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी शासनाने समाधानकारक तोडगा न काढल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय लाल बावटा संघटनेने घेतला आहे. त्यानुसार सोमवारी (दि. २१) सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

सरकारने कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांकडून जोखमीची कामे करून घेतली. मात्र, त्याचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणाचे कामही अतिरिक्त मोबदला न देताच करून घेण्यात आले. आता रॅपिड अँटिजन चाचण्याही घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशांवर टाकण्यात येत आहे. कोविड काळात जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या राज्यभरातील आशा व गट प्रवर्तकांवर होणारा अन्याय सहन करणे अशक्य असल्याने सिटू व समविचारी कामगार संघटनांनी बेमुदत संप सुरू केला आहे. कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला मिळावा, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्यावा, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्ती द्यावी, नियमित वेतनात भरीव वाढ करावी अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पण त्यातून मार्ग निघाला नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. सांगलीतील निदर्शनात जिल्हाभरातून आशा व गट प्रवर्तक सहभागी होणार असल्याची माहिती आंदोलनाचे संयोजक उमेश देशमुख यांनी दिली. नेतृत्व मीना कोळी, वर्षा ढोबळे, सुरेखा जाधव, हणमंत कोळी, विमल जाधव, अंजू नदाफ, शबाना आगा, लता जाधव आदींनी केले आहे.