शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मांगरूळच्या अंध अभयची डोळस प्रकाशवाट..!

By admin | Updated: June 17, 2016 23:31 IST

शिराळा कें द्रात प्रथम : सहावीपासून अंधपणा

बाबासाहेब परीट -- बिळाशी  -बापजाद्याची इस्टेट म्हणून पदरात आलेले अंधत्व घेऊन तो शोधतोय प्रकाशवाट. त्याचे डोळे गेले, पण उमेद जिवंत आहे. प्रकाशाची उमेद घेऊन अंधळ्या डोळ्यांनी तो स्वप्न पाहतोय आयएएस होण्याचे. पेरू पाहतोय प्रकाश आणि कवेत घेऊ पाहतोय यशाचे शिखर. दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: अंध असणाऱ्या अभय वसंत कुंभार या शिराळा तालुक्यातला मांगरुळच्या युवकाने बारावीत कला शाखेत केंद्रात पहिला येऊन इतरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. मांगरुळ (ता. शिराळा) येथील अभय कुंभार याने यशवंत विद्यालयात व केंद्रात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. सहावीपर्यंत सर्वसामान्य असणारा हा मुलगा घरी अभ्यासावेळी गणित सोडवत असताना, अचानक त्याच्या डोळ्यापुढे लाल गोळे दिसायला लागले आणि त्याला दिसायचे कमी आले. मिरज येथील रुग्णालयात गेल्यानंतर त्याच्या डोळ्याच्या रक्तवाहिन्या खराब झाल्याने त्याला अंधत्व आल्याचे परदेशातील ख्यातनाम डॉक्टरांनी सांगताच, त्याला रडू कोसळले. त्याचे डोळे फक्त उरले, अश्रूंपुरते. पण जिद्द न हारता त्याने पलूूस येथील धोंडीराम निवासी अंध विद्यालयात प्रवेश घेऊन एक वर्षात ब्रेल लिपी आत्मसात केली. गणितातील क्रिया, अंकवाचन तो शिकला. दहावीला त्याने ९०.८० टक्के गुण घेतले. लेखनिक घेऊन त्याने हे गुण मिळवले. बारावीला त्याने कॉलेजमधील ऐकीव ज्ञान, बे्रल लिपीतील पुस्तके वाचून अभ्यास केला. नालंदा अभ्यास केंद्रात तो दररोज अभ्यास करतो. अभ्यासक्रमाबाहेरची पुस्तके वाचताना त्याला मर्यादा पडते. अवांतर वाचनाची भूक मोठी असतानाही, अंधत्वामुळे त्याच्यावर मर्यादा येत आहेत. वीजपुरवठा खंडित झाला असला तरी, रात्री तो बे्रलमधील पुस्तके वाचतो. त्याचे अंधत्व हे त्याने बहुस्थान केले आहे. कुणी तरी मित्र मोठ्याने वाचतो, ते हा ऐकतो. गावात स्वत: एकटा फिरतो. घरात स्वत:चे व्यवहार करतो. एसटीने प्रवास करताना त्याला अडचणी येतात. रिलायन्स फौंडेशनमार्फत निघणारे अंधांसाठीचे पाक्षिक तो वाचतो. नियमित बातम्या ऐकतो. पेपर वाचन करुन घेतो. त्याच्या वडिलांनाही अकाली अंधत्व आलंय. मानसिक शक्तीच्या जोरावर तो उभाभाऊ एका डोळ्याने अंध, तर हा दोन्ही डोळ्यांनी. शारीरिक अपंगत्व आलं असलं तरी, मानसिक शक्तीच्या बळावर तो उभा आहे, परिस्थितीशी दोनहोत करायला! युपीएससी आणि एमपीएससीचे शिवधनुष्य पेलण्यासाठी त्याची चिकाटी सुरु आहे. बोलका संगणक मिळाला, तर त्याला यशाकडे जाण्यासाठी हातभार होईल. त्यासाठी उघड्या डोळ्यांनी जग पाहणाऱ्यांनी त्याच्याकडे आश्वासकपणे बघणे गरजेचे आहे.