शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील दोन्ही तलाठ्यांच्या बदलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील उरुण आणि शहर चावडीतील दोन्ही तलाठ्यांची बदली करावी, संगणकीय सात-बारा उताऱ्यामध्ये झालेल्या चुका पंधरा दिवसांत ...

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील उरुण आणि शहर चावडीतील दोन्ही तलाठ्यांची बदली करावी, संगणकीय सात-बारा उताऱ्यामध्ये झालेल्या चुका पंधरा दिवसांत दुरुस्त करून द्याव्यात, झिरो तलाठ्यांची हकालपट्टी करावी, शासकीय दफ्तर चावडीमध्येच असायला हवे, अशा मागण्या करत शिवसेनेचे शहरप्रमुख शकील सय्यद यांनी या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबतचे निवेदन सय्यद यांनी नायब तहसीलदार सुनील ढाले यांना दिले. या निवेदनात प्रलंबित नोंदी, वारस नोंदी, हिब्बानामाच्या नोंदी सत्वर कराव्यात, मोठ्या सर्व्हे नंबरमधील आणेवारी न जुळण्याचे कारण स्पष्ट करावे, दोन्ही चावडीमध्ये तलाठ्यांची उपस्थिती नसल्याने शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत, ऑनलाईन सात-बारातील चुकीच्या नोंदी सत्वर दुरुस्त करून मिळाव्यात, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

यावेळी अ‍ॅड. अविनाश पाटील, दीपक जाधव, महंमद शेख, अशोक चव्हाण, संदीप पवार, तात्यासाहेब बामणे, शिवकुमार शिंदे, जहीरउद्दीन खान, प्रकाश पालकर, सूर्यकांत पाटील, विजय धुमाळे, डॉ. अभिजित रानमाळे उपस्थित होते.

फोटो - १००२२०२१-आयएसएलएम-शिवसेना न्यूज

इस्लामपूर येथे शिवसेनेच्यावतीने शकील सय्यद यांनी नायब तहसीलदार सुनील ढाले यांना निवेदन दिले. यावेळी सूर्यकांत पाटील, अ‍ॅड. अविनाश पाटील, दीपक जाधव, संदीप पवार, जहीरउद्दीन खान, महंमद शेख उपस्थित होते.