शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडी चौकशीची मागणी

By admin | Updated: December 24, 2015 00:36 IST

पेपरफुटी प्रकरण : जि. प. स्थायी समितीत पोलीस उपअधीक्षकांचा निषेध

सांगली : जिल्हा परिषद आरोग्य सेविका पद परीक्षेतील पेपरफुटीची सीआयडीमार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला. तसेच जि. प. पदाधिकाऱ्यांबद्दल पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी चुकीचे विधान केल्याचाही सभेत निषेध करण्यात आला.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी पेपर फुटीच्या प्रकरणाचा अधिकाऱ्यांना जाब विचारला. तुम्हीच परीक्षा पारदर्शक होत असल्याचे सांगत असताना, पेपर कसा फुटला, अधिकाऱ्यांना सोडून तुम्ही काही कर्मचाऱ्यांवर हे प्रकरण लादत आहात, असा आरोप करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच पेपरफुटी प्रकरणाचा लवकर तपास करा आणि दोषी अधिकाऱ्यांना यातून बाहेर काढू नका, अशी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे मागणी केली होती. असे असताना गायकवाड यांनी ‘पदाधिकारी काय म्हणतात, याला आम्ही किंमत देत नाही’ असे उदगार काढून पदाधिकाऱ्यांची बदनामी केली आहे. या प्रकरणाचा आम्ही निषेध करीत आहोत, असा ठराव सदस्यांनी मांडला. त्यानुसार तो ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती रेश्माक्का होर्तीकर व सदस्य रणधीर नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.तसेच पेपरफुटी प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करून दोषी अधिकाऱ्यांचा शोध घेऊन पेपर फोडणाऱ्यांचे रॅकेट बाहेर काढण्याच्या मागणीचाही ठराव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले नाही, तर राज्य शासनाकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही होर्तीकर यांनी दिला. या सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती गजानन कोठावळे, पपाली कचरे, उज्ज्वला लांडगे, मनीषा पाटील, माजी अध्यक्ष देवराज पाटील, सदस्य फिरोज शेख, संजीवकुमार सावंत, अलकादेवी शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांच्यासह खातेप्रमुख व गटविकास अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शिक्षकांची रिक्त पदे : आंतरजिल्हा बदलीने भरा जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये २७१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक शाळांवर शिक्षक कार्यरत नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. म्हणून आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यातून सांगलीत येणाऱ्यांना नियुक्ती देऊन रिक्त जागा भरण्याची सूचना सदस्यांनी केली. त्यानुसार तसा ठराव मंजूर करण्यात आला.