शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

‘वालचंद’च्या ताब्यावरून भाजपमध्ये जुंपली

By admin | Updated: June 24, 2016 00:50 IST

खासदार-जिल्हाध्यक्ष आमने सामने : दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

सांगली : प्रतिष्ठित वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ताबा प्रकरणाला गुरुवारी वेगळेच वळण लागले. भाजपचे खासदार संजयकाका पाटील व ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात ताब्यावरून वाद उफाळून आला आहे. खासदार गटाने महाविद्यालयाचा ताबा घेतल्यानंतर देशमुख यांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली. दोन्ही गटाने मुख्यमंत्री व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे (एमटीई) अध्यक्ष असलेल्या पृथ्वीराज देशमुख यांनी महिन्याभरापूर्वी वालचंद महाविद्यालयाचा ताबा घेतला होता. तत्पूर्वी महाविद्यालयात अजित गुलाबचंद यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळ कार्यरत होते. नियामक मंडळाने रितसर नेमलेले संचालक डॉ. जी. व्ही. परिशवाड यांची हकालपट्टी करून डॉ. देवमाने यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी महाविद्यालयाचा ताबा पुन्हा परिशवाड यांच्याकडे सोपविला. यावेळी संजयकाका पाटील यांनी देशमुख यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला. देशमुख यांची गुंडगिरी खपवून घेणार नाही. प्रसंगी खासदारकी पणाला लावू, असा इशारा दिला. तर खा. पाटील यांना प्रत्युत्तर देताना देशमुख यांनी जोरदार टीका केली. खासदार पाटील हे अजित गुलाबचंद यांची सुपारी घेऊन काम करीत आहेत. त्यांना आताच वालचंदचा पुळका कसा आला? असा सवाल उपस्थित केला आहे. भाजपमध्येच वालचंदच्या ताब्यावरून दोन गट पडले असून, त्यांच्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. (प्रतिनिधी)सर्वपक्षीय : आंदोलनखासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी महाविद्यालयाचा ताबा पुन्हा परिशवाड यांच्याकडे सोपविला. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. यासाठी तातडीने पोलिस दाखल झाल्यामुळे वातावरण शांत झाले.