शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, मिरजेतील बेरोजगार तरुणांची लाखोंची फसवणूक

By admin | Updated: January 16, 2017 00:34 IST

एजंटाचे पलायन : आखाती देशात नोकरीचे आमिष

मिरज : आखाती देशात नोकरीच्या आमिषाने सांगली, मिरजेतील २५ ते ३० बेरोजगार तरुणांची एजंटाने फसवणूक केली आहे. परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी लाखो रुपये उकळून एजंटाने पलायन केल्याची तक्रार फसवणूक झालेल्या सातजणांनी मिरज शहर पोलिसांत केली आहे. मिरजेतील मेहबूब नामक एजंटाने दुबईत मॉलमध्ये ५० हजार रुपये पगारावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून प्रत्येकी ८० हजार ते १ लाख रुपये घेतले. मिरजेतील अशफाक शेख, अमिन नदाफ, मधू हंकारे, सांगलीतील रोहित शिंदे, सुनील शर्मा या पाचजणांना मेहबूब याने दि. १६ डिसेंबर रोजी मुंबईतील अन्य एका एजंटामार्फत दुबईला पाठविले. सर्वांना तीन महिन्यांच्या कालावधीकरिता पर्यटक व्हिसावर दुबईला पाठविले होते. दुबईत गेल्यानंतर सर्वांना नोकरीसाठी व्हिसा मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, दुबईत पोहोचल्यानंतर तेथील एजंटाने सफाई कामगार, हेल्पर या नोकरीसाठी १० ते १२ हजार पगार मिळेल, असे सांगून त्यांचा पासपोर्ट काढून घेतला. फसवणूक झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने मेहबूब याने दुबईतील एजंटाकडून माझीही फसवणूक झाल्याची बतावणी करून सर्वांना एका आठवड्यात परत आणले. मिरजेत आल्यानंतर तरुणांकडून घेतलेल्या रकमेपोटी धनादेश दिले. मात्र, हे धनादेश वटले नसल्याने मेहबूब याचा शोध घेतला असता, तो गेल्या आठवड्यापासून कुटुंबीयांसोबत घरातून गायब झाला आले. भामट्या एजंटाचा मोबाईलसुद्धा बंद असल्याने नोकरीच्या आमिषाने फसवणूक झालेल्या अशफाक शेख, रोहित शिंदे, अमिन नदाफ, मधू हंकारे, सुनील शर्मा, इम्रान पटेल (रा. मिरज), तोहिद मणेर (रा. बागलकोट) या सातजणांनी शहर पोलिसांत तक्रार केली. मेहबूब याने आणखी दहा ते पंधराजणांना नोकरीसाठी दुबईत पाठविले असून, त्यांचीही फसवणूक होऊन काहीजण तेथे अडकून पडल्याचे परत आलेल्या तरुणांनी सांगितले. आखाती देशात काही काळ नोकरी करून परतलेल्या महेबूब याने मिरजेत इंदिरानगर येथे दुकान थाटले होते. तेथे येणाऱ्या तरुणांना नोकरीच्या आमिषाने जाळ्यात ओढून फसवणूक केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून, अद्याप कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर