शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी पायजे रं... कोन्चं बटण दाबू ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:44 IST

महेंद्र गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : वेगवेगळे निकष लावून राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकºयांना ही कर्जमाफी मिळविण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्याकरिता ठिकठिकाणी असलेल्या महाईसेवा केंद्रांची मदत शेतकºयांना मिळत असून, कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू असून, कर्जमाफी पायजे रं... कोन्च बटण दाबू, अशी चर्चा महाईसेवा ...

महेंद्र गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : वेगवेगळे निकष लावून राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकºयांना ही कर्जमाफी मिळविण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्याकरिता ठिकठिकाणी असलेल्या महाईसेवा केंद्रांची मदत शेतकºयांना मिळत असून, कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू असून, कर्जमाफी पायजे रं... कोन्च बटण दाबू, अशी चर्चा महाईसेवा केंद्रात सुरू आहे.आॅनलाईन अर्ज सादर करताना बँका, सेवा सोसायटी व महाईसेवा केंद्रांमध्ये आॅनलाईन अर्जाचा नमुना उपलब्ध करण्यात आला असून, नमुना अर्ज परिपूर्ण भरून दिल्यानंतर त्यावरील माहिती आॅनलाईन अचूक भरली जात आहे.एका बाजूला खरीप हंगामातील शेतीची रखडलेली कामे व दुसºया बाजूला कर्जमाफी मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे काम यामुळे शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील १३० महाईसेवा केंद्रांवर कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरून दिले जात आहेत. कर्जमाफीसाठी राज्य सरकारने पती-पत्नी व अठरा वर्षांखालील मुले अशी कुटुंबाची व्याख्या केली आहे.आॅनलाईन अर्ज दाखल करण्याकरिता महाईसेवा केंद्रात जाताना शेतकºयांनी पती-पत्नीचे आधार कार्ड, बँकचे पासबुक, सेव्हिंग व लोन अकाऊंट दोन्हीही, पेन्शनर असतील तर पीपीओ नंबर व पॅनकार्ड उपलब्ध असल्यास सोबत ठेवणे गरजेचे आहे. जर मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक नसेल तर कर्जदाराने स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. शेतकºयांच्या कर्जाचा तपशील देण्याचे काम बँका, सेवा सोसायटी यांनी करणे गरजेचे आहे.ज्या गावची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे, अशा गावांमधील शेतकºयांना त्यांची कर्जे थकल्यावर शासनामार्फत पुनर्गठन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. परंतु ५० पैशांवरील पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.अचूक तपशील देणे गरजेचेसर्व बँका व विकास सेवा सोसायटी यांनी शेतकºयांना त्यांच्या कर्जाचा तपशील अचूक देणे गरजेचे आहे. बºयाचशा बँका शेतकºयांना त्यांना कर्जाचा योग्य तपशील देताना टाळाटाळ करीत असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास येत असून, बँकांची प्रशासनाने चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.