शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या नोटिशीने मिरजेत वाद

By admin | Updated: May 16, 2016 00:46 IST

चार कोटींचा दंड : ओढापात्रातून गाळ काढण्याचे प्रकरण आणखी तापले

मिरज : मिरजेत जलशिवार योजनेअंतर्गत लोकसहभागातून गेले दोन महिने ओढापात्रातील गाळ काढण्याचे काम करणाऱ्यांना तहसीलदारांनी चार कोटी रुपये दंडाची नोटीस बजाविल्याने याबाबत वाद निर्माण झाला आहे. शहरालगत पंढरपूर रस्ता ते मालगाव रस्त्यापर्यंत ओढापात्रातील झाडे-झुडपे, गाळ काढून स्वच्छता करण्यात आली आहे. मात्र ओढ्यातील मुरूम व माती वापरल्याबद्दल तहसीलदार किशोर घाडगे यांनी बांधकाम व्यावसायिक किशोर पटवर्धन यांना दंडाची नोटीस बजाविली आहे. मानमोडी, तानंग, सावळी, पंढरपूर रस्ता, मालगाव रस्ता, वखार भाग, रेल्वे ब्रीज, कृष्णा घाट रस्ता, कृष्णा नदीपर्यंत वाहणाऱ्या मिरजेतील ओढ्यात कचरा, सांडपाणी व काही उद्योगांचे दूषित पाणी सोडल्याने दुर्गंधी वाढून, ओढापात्रात गाळ साचून पाण्याचा प्रवाह बंद झाला होता. मिरज डेव्हलपमेंट फोरमनेओढ्याच्या पुनरुज्जीवनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. वालचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाहता राहण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार केला. तहसीलदारांच्या रितसर परवानगीनंतर जलशिवार योजनेअंतर्गत फेब्रुवारीत ओढ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर जेसीबी, डिझेल व खर्चाची रक्कम गोळा करून स्वयंसेवी संस्थेद्वारे महापालिका व प्रशासनाच्या देखरेखीखाली गाळ काढण्यात आला आहे. ओढा पुनरुज्जीवनासाठी बांधकाम व्यावसायिक किशोर पटवर्धन, राजा देसाई, मुनीर मुल्ला, मकरंद देशपांडे यांच्यासह नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. दोन महिन्यात ओढापात्रातील झाडे-झुडपे व शेकडो ट्रक गाळ काढण्यात आल्याने ओढ्याचे पात्र मोकळे झाले आहे. जलशिवार योजनेअंतर्गत गाळ काढण्यात आल्यानंतर तहसीलदार किशोर घाडगे यांनी, ओढापात्रातील सुमारे ८५ लाख रुपये किमतीची माती व मुरूमाचा खासगी जागेत भर टाकण्यासाठी वापर करण्यात आल्याने, चार कोटी रूपये दंडात्मक कारवाईची नोटीस बजाविली आहे. तहसीलदारांच्या दंडात्मक कारवाईचा वाद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पोहोचल्यानंतर पालकमंत्र्यांनी अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गाळ : खासगी जागेत जलशिवार योजनेअंतर्गत गाळ काढण्यात आल्यानंतर तहसीलदार किशोर घाडगे यांनी, ओढापात्रातील सुमारे ८५ लाख रुपये किमतीची माती व मुरूमाचा खासगी जागेत भर टाकण्यासाठी वापर करण्यात आल्याने, चार कोटी रूपये दंडात्मक कारवाईची नोटीस बजाविली आहे.