शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ॲपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणा हादरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:18 IST

मिरजेतील ॲपेक्स रुग्णालयातील डॉ. महेश जाधव याला सदोष मनुष्यवधप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. कोविड उपचारात हलगर्जीपणाबाबत डाॅक्टरवर ...

मिरजेतील ॲपेक्स रुग्णालयातील डॉ. महेश जाधव याला सदोष मनुष्यवधप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. कोविड उपचारात हलगर्जीपणाबाबत डाॅक्टरवर गंभीर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गतवर्षी कोविडच्या पहिल्या लाटेत महापालिकेकडून कोविड रुग्णालयाचा परवाना घेऊन डाॅ. महेश जाधव याने मिरजेतील सांगली रस्त्यावर भाड्याच्या जागेत रुग्णालय सुरू केले होते. गतवर्षीही येथे दाखल झालेल्या ४० टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. मात्र, येथे कोविड रुग्णांच्या झालेल्या मृत्यूची आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याने दुसऱ्या लाटेतही डाॅ. जाधव याचे काेविड हॉस्पिटल बिनबोभाट सुरू होते.

येथील उपचाराबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारीमुळे महापालिका प्रशासनाने त्याच्याविरुद्ध कारवाईचा पावित्रा घेतला. त्यानंतर डाॅक्टरने रुग्णांच्या जीवाशी केलेला खेळ उघडकीस आला आहे. अ‍ॅपेक्स कोविड रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपकरणे नसतानाही दोन महिन्यांत २०५ रुग्ण दाखल करून घेण्यात आले. यापैकी ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी आणखी काही अत्यवस्थ रुग्णांना शासकीय रुग्णालय व अन्यत्र पाठविण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. रुग्णालयात केलेल्या उपचारांच्या चाैकशीसाठी मिरज सिव्हिलचे डाॅ. शिशीर मिरगुंडे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. येथील रुग्णांच्या मृत्यूचे डेथ ऑडिट जिल्हा शल्यचिकीत्सकांमार्फत होणार आहे. पोलिसांनीही रुग्णांच्या मृत्यूच्या चाैकशी अहवालाची मागणी केली आहे. कोविड साथीदरम्यान रुग्णांवर उपचारासाठी बेड कमी पडू नयेत, यासाठी प्रशासनाने मागेल त्यास कोविड रुग्णालयाच्या परवानगी देत हाेते. प्रशासनाच्या या धोरणाचा फायदा घेत डाॅ. महेश जाधव याने आर्थिक फायद्यासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याचे पोलिसांच्या चाैकशीत निष्पन्न होत आहे. डॉ. जाधव यास मदत करणाऱ्या अन्य सात जणांवरही गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

चाैकट

अ‍ॅपेक्स रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २०५ रुग्णांपैकी ८७ रुग्णांचा मृत्यू झाला असून येथील मृत्युदर तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत आहे. मिरज सिव्हिलमध्ये ३५० रुग्णांवर उपचार सुरू असून मे महिन्यात २० टक्के व सध्या १५ टक्के मृत्युदर आहे. अ‍ॅपेक्स रुग्णालयाचा मृत्युदर देशात व राज्यातही सर्वाधिक असल्याने येथे रुग्णांना उपचार मिळाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.