ओळ : राेझावाडी (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे, पंचायत समिती सदस्य जनार्दन पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारिताेषिक वितरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बागणी : जिल्हा परिषदेच्या शाळांना अद्ययावत शैक्षणिक सुविधा देण्यासाठी नेहमी प्रयत्न करू. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षक, पालक, पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय असल्यास मुलांची गुणवत्ता वाढते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे यांनी केले.
रोझावाडी (ता. वाळवा) येथील थोरात वसाहत येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व विविध साेयी-सुविधांच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी वाळवा पंचायत समितीतर्फे एक स्मार्ट टीव्ही, रोझावाडी ग्रामपंचायतीतर्फे एक स्मार्ट टीव्ही संच शाळेस देण्यात आला. याशिवाय वीजपुरवठा, संपूर्ण लाइट फिटिंग, ट्यूब, पंखे व पिण्याच्या पाण्यासाठी ॲक्वा गार्ड आदी भौतिक सुविधांचे उद्घाटन संभाजी कचरे, पंचायत समिती सदस्य जनार्दन पाटील, रोझावाडीच्या सरपंच शकिलाबानू पिरजादे, उपसरपंच मैनुद्दीन पिरजादे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोरोना कालावधीत विद्यार्थी गुणवत्ता विकास मंच यांच्यातर्फे ऑनलाइन घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुनील आंबी, उज्ज्वला रांजणे, केंद्रप्रमुख नजमा पिरजादे, करुणा मोहिते, गोपीनाथ आडके, सुधाकर वसगडे, संदीप पाटील, ग्रामसेवक दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य गुंडा थोरात, आफताब पिरजादे, शिवाजी थोरात, राजेंद्र कोळी, सुनंदा थोरात, अधिकराव काटे, ज्योती मगदूम उपस्थित होते. मुख्याध्यापक संजय काटे यांनी स्वागत केले. मंदाकिनी झाडे यांनी आभार मानले.
170921\dsc_0903.jpg
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देताना मान्यवर