शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

दरीबडचीत पिके धोक्यात

By admin | Updated: October 23, 2014 22:49 IST

परतीच्या पावसाची पाठ

दरीबडची : परतीच्या मान्सून पावसाने दडी दिल्याने जत तालुक्यातील रब्बी हंगामातील पिके सुकू लागली आहेत. दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसावर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी पुरेशी ओल व कडक ऊन यामुळे पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झाली नाही. शेतकरी त्या ठिकाणी पाणी पाजू लागला आहे. पाऊस झाला नाही तर दर हेक्टरी उत्पादनात घट होणार आहे. रब्बी हंगाम हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. त्यापैकी ७८ हजार ९०० हेक्टर इतक्या प्रचंड क्षेत्रात ज्वारी पीक घेतले जाते. त्याशिवाय करडई पाच हजार हेक्टर, सूर्यफूल ३ हजार १०० हेक्टर, गहू २ हजार ३०० हेक्टर, हरभरा २ हजार हेक्टर व मका ८०० हेक्टर क्षेत्रात घेतला जातो. उर्वरित क्षेत्रात इतर गळीत धान्ये घेतली जातात.सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. कडक उन्हामुळे जमिनीतील ओल संपू लागली आहे. दुपारच्या वेळी पिके कोमेजू लागली आहेत. अनुकूल हवामान, पुरेशी ओल असलेल्या ठिकाणी पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झालेली आहे. परंतु सध्या पावसाची पिकांना गरज आहे. परतीचा पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होता. परंतु हवामान कोरडे झाले आहे. सकाळी दवबिंदू पडू लागले आहेत. त्यामुळे पाऊस पडण्याची चिन्हे नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शेतकरी पिकांना पाणी पाजू लागला आहे. त्यामुळे ओढे, नाले, बंधारे, विहिरींतील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.पांदीतील शेतजमिनीमध्ये आता ओपसा आला आहे. शेतकरी नांगरणे, कुळवणे, मशागत आदी कामे करणार आहे. त्याठिकाणी गहू, खपली, हरभरा पिकांची पेरणी केली जाणार आहे. सध्याच्या अनुकूल वातावरणामुळे पिकांची उगवण चांगली होणार आहे. (वार्ताहर)परतीच्या पावसाची पाठकडक उन्हामुळे जमिनीतील ओल संपू लागली आहे. दुपारच्या वेळी पिके कोमेजू लागली आहेत. अनुकूल हवामान, पुरेशी ओल असलेल्या ठिकाणी पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झालेली आहे. परंतु सध्या पावसाची पिकांना गरज आहे. परतीचा पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होता. परंतु हवामान कोरडे झाले आहे.