शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात रक्ताचा दुष्काळ...

By admin | Updated: June 14, 2016 00:03 IST

रक्तदान लोकचळवळ होण्याची गरज : संकुचित मानसिकताही रक्ताच्या तुटवड्यास कारणीभूत असल्याचे चित्र

शरद जाधव--- सांगली --आजच्या आधुनिक जीवनात मी आणि माझे कुटुंब यात आपले गुरफटलेपण वाढत असतानाच, ‘दान’ ही संकल्पना हद्दपार होत चालली आहे. तसेच रक्तदान करणे शरीरास लाभदायक आहे का? यासह अनेक भ्रामक कल्पनांमुळे, सध्या रक्ताची गरज असतानाही, जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे चिंताजनक चित्र आहे. जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे सलग दुष्काळाचा सामना करावा लागत असताना, आता संकुचित मानसिकतेमुळे रक्ताचाही दुष्काळ असल्याचे म्हणावे लागत आहे.आजच्या आधुनिक युगात देहदान, नेत्रदान आणि रक्तदान यांना महत्त्व आले आहे. विविध सामाजिक संघटनांच्या जागृतीमुळे या तीनही प्रकारात नागरिकांचा सहभाग वाढत आहे. पण रक्तदानाबाबत असलेले गैरसमज रूग्णांना अडचणीचे ठरत आहेत. रक्तदानामुळे दुसऱ्या व्यक्तीचे प्राण तर वाचतातच, परंतु तीन महिन्यांनी एकदा रक्तदान केल्यास आपले शरीर सुदृढ राहण्यास मदतच होते. किडनी आणि हृदयविकाराचे आजार देखील कमी होण्यास मदत होते, असे विज्ञान सांगत असले तरी, त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यातील रक्ताच्या तुटवड्याचा आढावा घेतला असताना, सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ‘ए’, ‘बी’ पॉझीटिव्ह आणि निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच शेजारच्या कर्नाटकातूनही रक्ताची मागणी असल्याने शहरातील रक्तपेढ्यांवर ताण पडत आहे. सांगली, मिरजेत एकूण ११ रक्तपेढ्या आहेत. यात शासकीय रूग्णालय, वसंतदादा, शिरगावकर व सिध्दिविनायक या जुन्या रक्तपेढ्यांचा समावेश आहे. गोरगरीब रूग्णांना खासगी रूग्णालयातील उपचार परवडत नसल्याने, ते शासकीय रूग्णालयाचा आधार घेतात. याठिकाणी केवळ ‘व्होल ह्युमन’ हे कोणतेही प्रक्रिया न केलेले रक्त उपलब्ध होते. अपघात व अन्य कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी त्यावेळी रुग्णालयाच्या मागणीनुसार रक्ताचा पुरवठा करू शकत नाही. त्यासाठी आपले सामाजिक भान जपत रक्तदान चळवळ वाढविणे ही गरज बनली आहे.सध्याची रक्ताची उपलब्धता लक्षात घेतली, तर ती मागणीपेक्षा खूपच कमी आहे. ज्या रूग्णाला रक्ताची गरज आहे, त्याच्या नातेवाईकांनाच त्यासाठी धावपळ करावी लागते. सध्या रक्तदान शिबिरांचेही प्रमाण कमी झाले आहे, हे दुर्दैवी असून केवळ सामाजिक संस्था, युवक मंडळे यांनीच नव्हे, तर सर्वांनीच यासाठी पुढाकार घेत रक्तदान चळवळ वाढविली पाहिजे. रक्तदानाचा एक निर्णय रुग्णाचे प्राण वाचवू शकतो, याचे भान प्रत्येक असायला हवे. -धनंजय भिसे, जनसंपर्क अधिकारी, भारती हॉस्पिटल रक्तपेढी, सांगली.