शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनात घुमणार डोंगरवाडीचे झांजपथक

By admin | Updated: January 13, 2016 23:33 IST

सहभागाचे निमंत्रण : दीडशे युवकांच्या पथकाचा दिल्ली, उत्तर प्रदेशातही वाजविला डंका

ऐतवडे बुद्रुक : डोंगरवाडी (ता. वाळवा) येथील अभिजित पाटील युवा मंचच्या झांजपथकास पुणे (पिंपरी—चिंचवड) येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे. डोंगरवाडी हे वाळवा तालुक्याच्या सरहद्दीवर वसलेले छोटेसे गाव. येथील हनुमान मंदिर सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात प्रसिध्द आहे. या गावातील युवकांनी संघटित राहावे, यासाठी माजी सरपंच प्रतिनिधी दिलीप शेखर यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभिजित पाटील यांच्या नावाने युवा मंचची स्थापना १३ मे १९९७ रोजी केली. या पथकात सुमारे १५0 युवकांचा सहभाग आहे. यापूर्वी या पथकाने गणेशोत्सवात दिल्ली, उत्तर प्रदेश येथील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यामुळे दरवर्षी दूरदूरच्या गणेशोत्सवात सहभागी होण्याचा मान या पथकास मिळत आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. डी. पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंत्री (ता. शिराळा) येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमात या झांजपथकाने कला सादर केली होती. त्यांच्या कलेने मंत्रमुग्ध झाल्यानेच, पाटील यांनी त्यांना संमेलनाच्या दि. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते संमेलन स्थळापर्यंत पार पडणाऱ्या ग्रंथदिंडीत वाद्यवृंदासह कला सादर करण्याचा बहुमान दिला आहे. (वार्ताहर) साहसी खेळांचा समावेश या झांजपथकात झेंडा सलामी, कवायत, कबड्डी, स्वस्तिक, खो—खो, कुस्ती या प्रकारासह विविध साहसी खेळ सादर केले जातात. माजी आमदार विनय कोरे, अभिजित पाटील यांच्या सहकार्यामुळे व उत्कृष्ट झांजपथकाच्या खेळामुळे आमच्या पथकास साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात मानाचा मुजरा करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करुन दाखवू, असे पथकप्रमुख दिलीप शेखर, श्रीरंग कोपार्डे, जयवंत माने, अनिल पेठकर यांनी स्पष्ट केले.