शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्वसंपन्न नेतृत्वाचा सुसंस्कृत वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे सुपुत्र, भारती विद्यापीठाचे कुशल प्रशासक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, शक्तिशाली ...

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे सुपुत्र, भारती विद्यापीठाचे कुशल प्रशासक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, शक्तिशाली व कुशल संघटक, युवकांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे युवा नेतृत्व, एक आक्रमक आंदोलक, पदयात्रा काढून दुष्काळग्रस्त जनतेच्या व्यथा जाणून घेणारे युवा नेते अशा अनेक भूमिकांमध्ये आपण डॉ. विश्वजित कदम यांची वाटचाल पाहत आहोत. आता प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, पलूस कडेगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, राज्याचे सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा आदी खात्यांचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे कर्तृत्वसंपन्न नेतृत्व म्हणून राज्यात आणि देशात नावलौकिक असलेल्या डॉ. पतंगराव कदम यांचा वारसा भक्कमपणे चालवत आहेत. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त.

राज्याच्या मंत्रिमंडळातील एक तरुण आणि वेगाने समाजहिताची कामं करणारे मंत्री म्हणून विश्वजित कदम पुढे येत आहेत. विश्वजित कदम यांच्यात

राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाची क्षमता असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांनी आणि दिग्गज नेत्यांनीही सांगितले. विश्वजित यांनी युवक चळवळीच नेतृत्व केलं आहे, राहुल गांधींचे खंदे शिलेदार म्हणून काम केलं आहे. युवक काँग्रेस आणि पदयात्रेतले विश्वजित कदम यांचे परिश्रम पाहून राहुल गांधी यांनी त्यांना राष्ट्रीय जबाबदारी देण्याचं ठरवलं होतं. कारण ती गुणवत्ता आणि परिश्रम घेण्याची क्षमता विश्वजित कदम यांच्यात आहे. हे राहुल गांधी यांना माहिती आहे. मात्र, विश्वजित कदम

यांनी स्वतः राहुल गांधी यांना भेटून

मला माझ्या मतदारसंघात, पलूस कडेगावच्या मातीतील जनतेची सेवा करायची आहे. राज्यात काम करायचे आहे, असे आवर्जून सांगितले होते. ९ मार्च २०१८ रोजी आदरणीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांचं निधन झालं. यामुळे रिक्त झालेल्या जागी विश्वजित कदम पलूस कडेगाव मतदारसंघातून बिनविरोध आमदार झाले, त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मताधिक्याने विजयी झाले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा महाविकास आघाडीची सत्ता आली. मंत्रिमंडळात विश्वजित कदम यांना

राजमंत्री म्हणून संधी मिळाली. जी मिळेल ती जबाबदारी समर्थपणे पार पडण्याची क्षमता विश्वजित कदम यांच्यात आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी तो वारसा विश्वजित कदम यांना दिला आहे. यामुळे डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा वारसा खांबीरपणे चालवत त्यांची वैचारिक, राजकीय आणि कार्यकर्तृत्वाची परंपरा पुढे नेण्याचं काम विश्वजित कदम समर्थपणे करत आहेत.

वडिलांप्रमाणेच त्यांच्याकडे विधायक व व्यापक दृष्टी आहे, जनतेची मनं जिंकून घेणारा स्वभाव आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यातली सहजता, विनम्रता, सुसंस्कृतपणा जनतेला भावणारा आहे.

विश्वजित कदम हे राज्याच्या मंत्रिमंडळातील तरुण मंत्री आहेत. सर्वात सुपरफास्ट मंत्री म्हणून विश्वजित कदम यांचं नाव घेतलं जातं. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी स्थापन केलेली भारती विद्यापीठ ही संस्था देशातील एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या कारभाराचा व्याप

ते गेल्या अनेक वर्षांपासून समर्थपणे सांभाळत आहेत. राहुल गांधींना अभिप्रेत असलेलं सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काम मंत्री म्हणून सक्षमपणे करीत आहेतच, शिवाय काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून

पक्ष संघटनाचे कामही सातत्याने करीत आहेत. नेतृत्व एका दिवसात

घडत नाही, ते घडवावं लागतं. ते घडविणारी जनता पलूस कडेगावमध्ये आहे. यामुळे विश्वजित कदम आज ताकदीने मंत्रिमंडळात काम करीत आहेत.

मागील वर्षापासून राज्यमंत्री

म्हणून कार्यरत असलेल्या विश्वजित कदम यांच्या जीवनात नवा अध्याय सुरू झाला आहे. एखाद्या राजकीय नेत्याने संकटकाळात जनतेला मदत कशी करावी, धीर कसा द्यावा याचं आदर्श उदाहरण डॉ. विश्वजित कदम यांनी त्यांच्या कामातून

घालून दिले आहे.

महापुराच्या संकटकाळात विश्वजित कदम यांनी कृष्णाकाठच्या लोकांना केलेली मदत, कोरोनाच्या संकटात त्यांनी व्यक्तिगत केलेली मदत आणि भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून दिलेली रुग्णसेवा, लॉकडाऊनच्या काळात त्यांनी जनतेशी संवाद साधून दिलेला धीर, हे सगळं संकटकाळात एखाद्या नेत्यानं जनतेला मदत कशी करावी, याचं आदर्श उदाहरण आहे.

राजकीय नेतेमंडळी आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्र्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. कोरोनाविरोधातल्या लढाईत विश्वजित कदम यांनी प्रशासनातील संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यासोबत पलूस कडेगाव मतदारसंघात गावोगावी

जावून कंटेन्मेंट झोनला भेटी दिल्या. याशिवाय राज्यभरात विविध ठिकाणी जाऊन लागेल ती मदत व सहकार्य केले आहे. राज्यमंत्री म्हणून काम करीत असताना सर्वसमावेशक विकास करणं. राज्यातील जनतेच्या भल्याचे अधिकाधिक निर्णय घेणं, शेतकऱ्यांचे हित जपणं व राज्यावरील संकटांचा निर्धारानं मुकाबला करणं, हेच मुख्य ध्येय डोळ्यांसमोर ठेवून विश्वजित कदम कार्यरत आहेत.

त्यांच्या अंगी असलेला समजूतदारपणा, सुसंस्कृत आणि सोज्वळ स्वभाव सामान्य जनतेला भावतो. काँग्रेसला आणि पलूस कडेगाव मतदारसंघाला डॉ. विश्वजित कदम यांच्या रूपानं एक सक्षम आणि कुशल नेतृत्व पलूस कडेगाव मतदारसंघाला लाभलं आहे. त्यांची कार्यशैली पाहताच डॉ. पतंगराव कदम साहेब यांची प्रकर्षाने आठवण होते. राज्याचे मंत्री म्हणून विश्वजित कदम हे सक्षमपणे जबाबदारी सांभाळत पलूस कडेगाव मतदारसंघाला विकासाच्या मार्गावर सातत्याने अग्रेसर ठेवतील, असा विश्वास आहे. विश्वजित कदम यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी

समर्थपणे सांभाळली आहे. आता प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांचं नेतृत्व भक्कम आहे, त्यामुळे काँग्रेसमधील शक्तिशाली संघटक म्हणून त्यांची राज्यभरात चर्चा आहे.

इतकेच नव्हे तर त्यांची वैचारिक बैठकही पक्की आहे. कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास आहे. कुठल्याही परिस्थितीत ते विचलित होत नाहीत. तोल जराही ढळू देत नाहीत. वस्तुस्थिती समजून घेऊन, परिस्थितीचा समतोल विचार, सखोल अभ्यास करून निर्णय घेतात. त्या निर्णयात दृढता आहे. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून तो योग्य असल्याचे पटवून देण्याची क्षमता, कौशल्य त्यांच्याकडे आहे.

डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा वारसा, भारती विद्यापीठ, भारती बँक, भारती हॉस्पिटल, सोनहीरा सहकारी साखर कारखाना, सागरेश्वर व कृष्णा वेरळा सहकारी सूतगिरणी असे सहकारातील संस्थांचे जाळे, काँग्रेसचे कार्याध्यक्षपद,

सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा आदी खात्यांचे राज्यमंत्री इतकी ताकद जवळ असूनही विश्वजित कदम यांचा विनम्रपणा लोकांना भावणारा आहे. हीच त्यांची मोठी ताकद आहे. चांगलं काम करणारा एक तरुण मंत्री म्हणून नवी ओळख

निर्माण झालेल्या व राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कार्यरत असलेल्या विश्वजित कदम यांनी यापूर्वीच

यूथ काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून चांगली

बांधणी केली आहे. राज्य मंत्रिमंडळातील

तरुण मंत्री असलेल्या विश्वजित कदम यांच्याकडे आश्वासक चेहरा म्हणून तमाम महाराष्ट्र पाहतोय.

लेखक : प्रताप महाडिक, कडेगाव