शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST

आष्टा : आष्टा ग्रामीण रुग्णालयात सोमवारपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी ...

आष्टा : आष्टा ग्रामीण रुग्णालयात सोमवारपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी २०० ऐवजी १८५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले तर मंगळवारी १८२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले यात बाहेरगावच्या नागरिकांना संधी मिळाली.

आष्टा ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. कोविन अ‍ॅपवर नोंदणी झाल्यानंतरच दुसऱ्या दिवशी लसीकरण करण्यात येणार आहे मात्र ऑनलाईन नोंदणी न झाल्यास लसीकरण होणार नाही.

याबाबत अनेक नागरिकांना शंका असल्याने त्यांनी ग्रामीण रुग्णालय लसीकरण केंद्रात गर्दी केली होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सुतार व सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या आगमनानंतर लसीकरण सुरू झाले मात्र अनेकांची कोविन अ‍ॅपवर नोंदणीच होत नसल्याने गोंधळ उडाला.

ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष निगडी यांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होणार असल्याने ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचा नाईलाज आहे असे सांगितले. ऑनलाईन नोंदणीनंतरच आम्ही लसीकरण करणार आहोत.

आष्टा ग्रामीण रुग्णालयात १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू असल्याने ४५ वर्षावरील नागरिकांनी आष्टा ऐवजी बागणी, बावची व दुधगाव या ठिकाणी गेल्यास त्यांनाही लस मिळणार आहे.

चौकट

स्थानिकांना लस कधी

आष्टा शहरातील ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. या ठिकाणी आष्टा शहरातील अत्यल्प नागरिकांना लस मिळत आहे. सांगली, कराड, कोल्हापूरसह बाहेरील नागरिक ऑनलाईन नोंदणी करून लस घेत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना लस मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.