शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पुष्प प्रदर्शन पाहण्यास गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:10 IST

सांगली : निसर्गापासून दुरावत चाललेल्या नव्या पिढीला निसर्गाशी एकरूप करणाऱ्या आणि विविध प्रकारच्या मनमोहक फुलांच्या दुनियेत घेऊन जाणाºया गुलाब पुष्प प्रदर्शनास रविवारी सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होती. पाच हजारहून अधिक फुले आणि फुलांपासून बनविण्यात आलेल्या विविध रचना पाहण्यासाठी गर्दी होती. प्रदर्शनानिमित्त विविध प्रकारच्या ...

सांगली : निसर्गापासून दुरावत चाललेल्या नव्या पिढीला निसर्गाशी एकरूप करणाऱ्या आणि विविध प्रकारच्या मनमोहक फुलांच्या दुनियेत घेऊन जाणाºया गुलाब पुष्प प्रदर्शनास रविवारी सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होती. पाच हजारहून अधिक फुले आणि फुलांपासून बनविण्यात आलेल्या विविध रचना पाहण्यासाठी गर्दी होती. प्रदर्शनानिमित्त विविध प्रकारच्या फूलझाडांच्या विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळाला.दि सांगली रोझ सोसायटी व मराठा समाजच्यावतीने आयोजित गुलाब पुष्प प्रदर्शन व पुष्परचना स्पर्धेचा सांगता समारंभ रविवारी सायंकाळी पार पडला. यावेळी सातारा वन विभागाचे उप वनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका डॉ. विनीता व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.मराठा समाज सांस्कृतिक भवनमध्ये शनिवारपासून प्रदर्शनास सुरुवात झाली होती. रविवार सुटीचा दिवस असल्याने प्रदर्शन पाहण्यास सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती. विविध प्रकारातील गुलाब, देशी व विदेशी फुले आणि झाडांपासून तयार करण्यात आलेल्या रचना आकर्षित करत होत्या. तब्बल सोळा तास मेहनत करून कोलकाता येथील चार कलाकारांनी आर्किडच्या फुलांपासून तयार केलेल्या नऊ फुटी दोन मोरांच्या रचनेला विशेष दाद दिली जात होती. बक्षीस वितरण समारंभावेळी उप वनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनीता व्यास यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.यावेळी नानासाहेब चितळे, मराठा समाजचे अध्यक्ष अ‍ॅड. उत्तमराव निकम, शहाजीराव जगदाळे, प्रकाश चव्हाण, प्रकाश मव्दाण्णा, ज्योती चव्हाण, नंदा झाडबुके, पद्मजा चौगुले, अश्विनी पाचोरे, पापा पाटील, प्रज्ञा सावंत यांच्यासह रोझ सोसायटी व मराठा समाजचे पदाधिकारी उपस्थित होते.