शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाला निरोप देण्यासाठी सांगलीमध्ये गर्दी

By admin | Updated: September 12, 2016 00:27 IST

गर्दीचा उच्चांक : महापालिकेच्या कृत्रिम कुंडातही मोठ्या प्रमाणावर मूर्तींचे विसर्जन

सांगली : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’ची भावनिक साद घालत रविवारी सातव्या दिवशी गणेश विसर्जनाला कृष्णाकाठावर गर्दी झाली होती. रविवारची सुट्टी आणि परंपरेनुसार सातव्या दिवशी विसर्जनाला अधिक प्राधान्य असल्याने, दुपारपासूनच घाटावर गर्दी झाली होती. रविवारी कृष्णा नदीसह महापालिकेने शहरात तसेच उपनगरांमध्येही तयार केलेल्या विसर्जन कुंडातही मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. रविवारी गणेश विसर्जनाचा सातवा दिवस होता, पण मूळ नक्षत्रामुळे तर्कवितर्क लढविले जात होते. यावर ज्योतिषांमध्येही मतभिन्नता होती. मात्र, गणेशचतुर्थीला मुहूर्तावरच गणरायाचे आगमन झाल्याने विसर्जनास अडचण येणार नसल्याची प्रतिक्रिया पंचांग अभ्यासकांनी व्यक्त केली होती. रविवारी सुटीचा दिवस असल्याने दुपारपासूनच सरकारी घाट, माई घाट, विष्णू घाट येथे घरगुती गणपतींना निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सात दिवस घरात उत्साह आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या गणरायाला निरोप देताना भाविक भावूक झाले होते. कृष्णा नदीतील पाणीपातळी कमी झाल्याने अनेकजण नदीत आतपर्यंत जाऊन विसर्जन करत होते, तर काहींनी नावेने पात्रात जाऊन विसर्जन केले. सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जनाला नदी घाटावर अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली होती. कुटुंबातील सर्वच सदस्य विसर्जनासाठी आल्याने नदीघाट गर्दीने फुलून गेला होता. गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. घाटावर आरत्यांचा गजर आणि अगरबत्ती, धूपमुळे वातावरण सुगंधित झाले होते. बहुतांश शहरवासीयांनी नदीघाटावर गर्दी केली होती, तरीही महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन कुंडातही यंदा मोठ्याप्रमाणावर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. (प्रतिनिधी) सामाजिक संघटनांनी दिलेली पर्यावरण संवर्धनाची साद व त्याला भाविकांनी प्रतिसाद दिल्याने यंदा निर्माल्य नदीत न टाकता ते कुंडात संकलित केले जात होते. तसेच महापालिकेने शहरात ठिकठिकाणी निर्माण केलेल्या विसर्जन कुंडात मूर्तीच्या विसर्जनासाठीही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. वसंतनगर येथे निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात एका दिवसात चारशेवर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.