शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांवर संकट; कर्जफेडही अडचणीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:06 IST

कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीचा फटका; छाटणीची कामे पाण्याअभावी खोळंबलीविहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे

गजानन पाटील ।संख : कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व भागातील आॅक्टोबर महिन्यातील ३० टक्के छाटणीची कामे पाण्याअभावी खोळंबली आहेत.

यावर्षी द्राक्ष छाटणीची कामे पाण्याअभावी होणार नसल्याने द्राक्षबागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. पाण्याअभावी द्राक्षबागाच काढून टाकाव्या लागणार असल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. द्राक्षबागांवर काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न शेतकºयांसमोर उभा राहिला आहे.

जत तालुक्यामध्ये ६ हजार ६७० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: लाखो लिटरची शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. शरद, सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी द्राक्षजातीच्या बागा आहेत.

विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे. उमदी, बिळूर, सिद्धनाथ, तिकोंडी, भिवर्गी, अंकलगी, जालिहाळ खुर्द, मुचंडी, डफळापूर, दरीकोणूर, जालिहाळ बुद्रुक, कोंत्येवबोबलाद, हळ्ळी, बेळोंडगी, करजगी आदी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे.पण यावर्षी पाऊसच नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व व दक्षिण भागातील सर्वच्या सर्व तलाव व दोन मध्यम प्रकल्प पाण्याअभावी मे-जून महिन्यातच कोरडे पडले होते. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे. पाण्याची पातळी ६०० ते ७०० फुटापर्यंत खाली गेली आहे. भूजल सर्वेक्षणानुसार तालुक्यातील पाण्याची पातळी २१४ मीटर खाली गेली आहे. तालुक्यात यावर्षी अत्यल्प सरासरी २०० मिलिमीटर इतकाच पाऊस पडल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. १४ गावे व त्याखालील वाड्या-वस्त्यांवर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

कूपनलिका खोदली तरीही पाणी लागत नाही. पूर्व भागातील दरीबडची, संख, उमदी, माडग्याळ, सोन्याळ, उटगी, सिद्धनाथ परिसरात पाऊस कमी झालेला आहे. द्राक्षबागायतदारांनी आतापर्यंत टॅँकरने पाणी घालून काड्या व बागा जगविल्या आहेत.

पण परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आॅक्टोबर महिन्यातील ३० टक्के छाटण्या रखडलेल्या आहेत. तर काही शेतकºयांनी अवकाळी पावसाच्या भरवशावर छाटण्या घेतलेल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून बागांना पाणी मिळणे मुश्किल होणार असल्याने द्राक्षबागा वाळणार आहेत. टॅँकर भरायलाही पाणी मिळणार नसल्याने बागा काढून टाकण्याशिवाय कोणताच पर्याय राहणार नाही. शेतकºयांच्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याने बागायतदार चिंताग्रस्त बनला आहे.बेदाणा उत्पादन : घटणारपाण्याअभावी द्राक्षबागांची छाटणी झाली नसल्याने द्राक्ष उत्पादन कमी होणार आहे. परिणामी बेदाणा उत्पादनात घट होणार आहे. बेदाणा निर्मितीमुळे मजुरांना काम मिळत होते. पण आता मजुरांना कमी रोजगार मिळणार आहे. 

द्राक्ष उत्पादक शेतकरी विलासराव शिंदे म्हणाले, पाणी नसल्याने छाटण्या रखडलेल्या आहेत. जानेवारीनंतर पाण्याविना बागा वाळून जाणार आहेत. शेतकरी यातून वर येणार नाही. प्रपंच चालविणेही अवघड होणार आहे. शासनाने कर्जमाफी करावी, कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे, अशी आमची मागणी आहे.- सोमनिंग मौलापुरे, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली