शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमधील गुन्हेगार मृत्यूपश्चात हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

कुपवाड येथील खारे मळा परिसरातील सनी जैन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. गत महिन्यात त्याचा भाऊ शशांक उर्फ ...

कुपवाड येथील खारे मळा परिसरातील सनी जैन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. गत महिन्यात त्याचा भाऊ शशांक उर्फ चिट्या पारसमल जैन (वय २०) याने घरगुती भांडणातून सनीचा खून केला. खूनप्रकरणी चिट्या जैन यास पोलिसांनी अटक केली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. सनी जैन याच्याविरुद्ध मारामाऱ्या, चोरी व खंडणी बाल लैंगिक अत्याचार असे सात गुन्हे दाखल असल्याने कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गतवर्षी मिरज प्रांताधिकाऱ्यांकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. हद्दपार प्रस्तावाच्या सुनावणीस तीन वेळा तो गैरहजर होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा दोन आठवड्यापूर्वी खून झाला. मात्र त्याच्या मृत्यूबाबत पोलिसांनी कळविले नसल्याने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दि. ८ फेब्रुवारी रोजी सनी जैन यास सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपारीचा आदेश पोलिसांना दिला आहे. यातील आरोपीचा मृत्यू झाला असल्याने त्याचा मृत्यू दाखला हजर करुन हद्दपारीचा आदेश रद्द करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फाेटाे : १० सनी जैन