शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीप्रकरणी २१ व्यापाऱ्यांवर फौजदारी

By admin | Updated: October 30, 2014 01:14 IST

महापालिकेचा निर्णय : १५४ व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव

सांगली : एलबीटी (स्थानिक संस्था कर) भरण्यास विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांबाबत महापालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आजअखेर नोंदणीच केली नसलेल्या २१ व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, १५४ व्यापाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर यांनी आज, बुधवारी दिली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांतील काही व्यापारी, उद्योजकांनी एलबीटीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाला फटका बसला आहे. आॅक्टोबरची सध्याची एलबीटी वसुली केवळ ४ कोटी ३ लाख रुपये झाल्याने महापालिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. त्यामुळेच महापालिकेने नोंदणी न करणाऱ्या, करावर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर ज्यांनी नोंदणीच केली नाही, अशा १५४ व्यापाऱ्यांवर कारवाईबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाने मंजुरी दिल्यास या व्यापाऱ्यांचे दफ्तर ताब्यात घेऊन त्यांच्या सर्व व्यवहारांची तपासणी निश्चित केली जाईल. कर चुकविल्याबद्दल दंडात्मक कारवाईही होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेच्या कोणत्याही सूचना धुडकावून कर बुडविणाऱ्या २१ व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे येत्या दोन दिवसांत दाखल केले जाणार आहेत. ७५ व्यापाऱ्यांना शेवटची संधी म्हणून १३ व १४ नोव्हेंबरला सुनावणीसाठी हजर राहण्याची सूचना दिली आहे. महापालिकेच्या एलबीटीसाठी आजवर एकूण ९ हजार ९६६ व्यापारी, व्यावसायिक व उद्योजकांनी नोंदणी केली आहे. नोंदणी करूनही कर न भरणारे व नोंदणी न करणारे व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांना आता महापालिकेने लक्ष्य केले आहे. दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने ९० व्यापाऱ्यांची बँक खाती सील केली होती. त्यानंतर कर भरणाऱ्या ३० व्यापाऱ्यांची खाती पूर्ववत करण्यात आली. सणातही फटका दसरा, दिवाळीचा सण पार पडल्यानंतरही महापालिकेच्या तिजोरीत एलबीटीचा पैसा जमा होऊ शकलेला नाही. महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. सध्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार दीड महिना उशिरा होत आहेत. शहरातील विकासकामांवरही याचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिकेने करविरोधी आंदोलन आता गांभीर्याने घेतले आहे. (प्रतिनिधी)