शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कोविड नियमावलीचा भंग करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखत ग्रामसुरक्षा समिती आणि वॉर्ड सुरक्षा ...

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखत ग्रामसुरक्षा समिती आणि वॉर्ड सुरक्षा समितीच्या माध्यमातून सर्वांनी सामूहिक पद्धतीने काम करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी केले. यापुढे कोविड नियमावलीचा भंग करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.

येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात वाळवा तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत गेडाम यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती आणि त्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची गेडाम यांनी माहिती घेतली. यावेळी प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी अरविंद माळी, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील उपस्थित होते.

गेडाम म्हणाले, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावातील ग्रामसुरक्षा समिती आणि शहरातील वॉर्ड सुरक्षा समिती सक्रिय करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा. या समित्यांच्या माध्यमातून गृहविलगीकरणात उपचार घेणारे रुग्ण, विनाकारण बाहेर फिरणारे नागरिक, मास्कचा वापर न करणारे नागरिक यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. समितीकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल.

ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असतील तेथे मायक्रो कंटेन्मेंट झोन केले जाणार आहेत, तसेच जेथे कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल, असे हॉटस्पॉटचे परिसर सील केले जाणार आहेत. छोटे कार्यक्रम, लग्न समारंभ यामधूनही जर कायद्याचा भंग होत असेल तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश गेडाम यांनी दिले. भाजीपाला खरेदीवरून होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजी विक्रेत्यांना घरोघरी जाऊन व्यवसाय करण्याची सूचना त्यांनी केली. लसीकरणाच्या ठिकाणी अवास्तव गर्दी होणार नाही यासाठी सुरक्षा समित्यांनी भागनिहाय लसीकरणाचे नियोजन करावे.