शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लेडीज हॉस्टेलचे अवघ्या पाच दिवसात कोविड हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:27 IST

सांगली : श्री भगवान महावीर कोरोना हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगलीतील श्रीमती कस्तुरबाई ...

सांगली : श्री भगवान महावीर कोरोना हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगलीतील श्रीमती कस्तुरबाई वालचंद मुलींच्या वसतिगृहाचे अवघ्या पाच दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले.

अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी युक्‍त ४० बेडची सुविधा या हॉस्पिटलमध्ये आहे. गेल्यावर्षी समस्त जैन समाजातील दानशूर व्यक्‍तींनी दिलेल्या मदतीतून ७५ लाखांची वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली होती. ४० बेड‌्सची सुविधा असलेल्या या हॉस्पिटलमध्ये १५ बेड्स आयसीयू व्हेंटिलेटर व हायफ्लो नोझलयुक्‍त तसेच २० ऑक्सिजन बेड‌्सची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या ऑक्सिजन फिटिंगसाठी सुनील कोथळे, इलेक्ट्रिक सुविधासाठी रमेश खोत, सागर जोशी, ऑक्सिजन व्यवस्थेसाठी अशोक शिंदे आणि अमोल चोगुले यांनी तसेच संजय आवटी, डॉ. दिनेश भबान यांनी जबाबदारी स्वीकारत हातभार लावला आहे. डॉ. बी. एस. पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. अमोल पाटील, डॉ. प्रीतम आडसुळे, डॉ. अमोल सकळे व इतर १५ डॉक्टर्स, २० नर्सेस, ५ क्लिनिंग स्टाफ, ५ मॅनेजमेंट स्टाफ अशा एकूण ४० स्टाफचे योगदान लाभले आहे, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात अवघ्या दहा दिवसात १०० रुग्ण दाखल झाले त्यापैकी ८० रुग्णांनी यशस्वी मात केली आहे.

सुरेश पाटील म्हणाले, जैन समाजातील दानशूर व्यक्‍ती तसेच सुभाष बेदमुथा, जितेंद्र नाणेशा, अजित पाचोरे, राजगोंडा पाटील, वसंत पाटील, सुभाष देसाई यांचे सहकार्य लाभले आहे. २२ खोल्यांमध्ये स्वतंत्र टॉयलेट, बाथरूमची सोय आहे. रुग्णांना संपूर्ण पौष्टिक नास्टा आणि जेवण, काढा, हळदी दूध याची मोफत व्यवस्था केली जाते.