शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

उपअभियंत्यांना रस्त्यासाठी घेरावो

By admin | Updated: January 28, 2015 01:02 IST

विट्यात आंदोलन : दुरूस्तीसाठी पंधरा दिवसांची मुदत

विटा : शहरातील कऱ्हाड रस्त्यावर असलेल्या ओढ्यापासून ते रिलायन्स पंपापर्यंतचा अपघातास निमंत्रण ठरत असलेला रस्ता तातडीने दुरूस्त करून पुलाची रूंदी वाढवावी, या मागणीसाठी आज, मंगळवारी दुपारी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. व्ही. साखरे यांना नागरिकांनी घेरावो घातला. यावेळी उपअभियंता साखरे यांनी विटा-कऱ्हाड रस्त्याची येत्या आठ दिवसांत तातडीने दुरूस्ती करून पुलाची उंची वाढविण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, नागरिकांनी आठ दिवसांऐवजी पंधरा दिवसांची मुदत अधिकाऱ्यांना देऊन या कालावधित रस्ता दुरूस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.विटा ते कऱ्हाड रस्त्यावर असलेल्या ओढ्यावरील पूल अत्यंत अरूंद आहे; तर रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने पंधरा दिवसांत पाच ते सात मोठे अपघात होऊन लोकांना जीव गमवावा लागला आहे. ओढ्यावरील पूल अरूंद असल्याने दोन वाहने एकाचवेळी पास होत नाहीत. त्यामुळे या भागात मोठे अपघात होत आहेत. परिणामी, रस्त्याची दुरूस्ती करून पुलाची रूंदी वाढवावी, यासाठी आज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुकेश जगताप, गणेश गायकवाड, राजेंद्र शितोळे, कुमार पवार, अनिल गायकवाड, कुमार शितोळे, सचिन गायकवाड, सदाशिव शितोळे, प्रशांत गायकवाड, दिलीप राठोड, सुनील गायकवाड, मनोहर सावंत, शंकर पवार, विनोद कुरळे, सुनील पाटील आदींसह नागरिकांनी उपअभियंता साखरे यांना घेरावोे घातला. त्यावेळी उपअभियंता व्ही. व्ही. साखरे यांनी आठ दिवसांत रस्त्याची दुरूस्ती व पुलाची रूंदी वाढविण्याचे अंदाजपत्रक तयार केले जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, नागरिकांनी पंधरा दिवस कालावधी घ्या, पण हे काम तातडीने करा, असे सूचविले. या कालावधित काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला. (वार्ताहर)