शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या श्राध्दाचा खर्च दुष्काळग्रस्तांना

By admin | Updated: May 18, 2016 00:15 IST

भाळवणीच्या दीपक माळींचे दातृत्व : जिल्हाधिकाऱ्यांकडे ५१ हजारांचा धनादेश सुपूर्द

अजित कदम -- भाळवणी --कुटुंबियातील आनंदाच्या कार्यक्रमातील खर्चात बचत करून सामाजिक कार्याला आर्थिक मदत करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असताना, जन्मदात्या आईच्या वर्षश्राध्दाचा होणारा खर्च दुष्काळाने होरपळणाऱ्या दुष्काळग्रस्तांना देण्याचे दातृत्व भाळवणी (ता. खानापूर) येथील दीपक तुकाराम माळी व त्यांच्या पत्नी खानापूर पंचायत समितीच्या सभापती सौ. वैशाली माळी यांनी दाखविले आहे. त्यांचे दातृत्व म्हणजे दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचाच नव्हे, त्यांचे दु:ख हलके करण्याचाच प्रयत्न माळी दाम्पत्याने केला आहे. भाळवणीचे दीपक माळी यांनी ५१ हजाराचा धनादेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला.भाळवणी येथील दीपक माळी यांची आई व खानापूर पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ. वैशाली माळी यांच्या सासू प्रमिला तुकाराम माळी (वय ६५) यांचा तिसरा स्मृतिदिन होता. त्यामुळे वर्षश्राध्दासाठी लोकांना भोजन व अन्य खर्च करण्यापेक्षा खानापूर तालुक्यातील भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी हा पैसा वापरण्याचा निर्णय माळी दाम्पत्याने घेतला. त्यानुसार वर्षश्राध्द धार्मिक विधीप्रमाणे करून या कार्यक्रमाच्या खर्चाची रक्कम दुष्काळग्रस्त निधीला देण्यासाठी माळी दाम्पत्याने ५१ हजार रूपयांचा धनादेश तयार केला.सोमवारी दुपारी आ. अनिल बाबर यांच्याहस्ते हा ५१ हजाराचा धनादेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, दीपक माळी, विट्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार कल्पना ढवळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, जोतिराम पवार, नामदेव पवार, अनिल चव्हाण, राजू सूर्यवंशी, विजय यादव, शहाजी धनवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक माळी यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (वार्ताहर)दातृत्व आदर्शवत...दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. स्वत:च्या घरातील कार्यक्रमाला फाटा देऊन या आपत्तीला आर्थिक मदत करण्याचे धाडस फारच कमी लोकांच्यात असते. मात्र, दीपक माळी व सभापती वैशाली माळी यांनी आईच्या वर्षश्राध्दाचा खर्च देऊन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे दातृत्व आदर्शवत राहील, अशी प्रतिक्रिया आ. अनिल बाबर व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिली.