शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

महापालिका अधिकार्‍यांवर फौजदारी दाखल करणार

By admin | Updated: May 29, 2014 00:50 IST

सतीश साखळकर : शहरातील रस्ते परग्रहासारखे सांगली : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था पाहिली तर हे रस्ते परग्रहावरील वाटत आहेत.

सतीश साखळकर : शहरातील रस्ते परग्रहासारखे सांगली : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था पाहिली तर हे रस्ते परग्रहावरील वाटत आहेत. शहरात ड्रेनेज, मोबाईल व केबलसाठी मोठ्या प्रमाणावर चरी काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे. या सर्व गोष्टींना महापालिकेतील अधिकार्‍यांची सुंदोपसुंदी जबाबदार आहे. त्यांनी कारभारात सुधारणा केली नाही, तर अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी बुधवारी आयुक्तांना दिला आहे. साखळकर यांनी आयुक्त अजिज कारचे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, वास्तविक नूतन लोकप्रतिनिधींचे मंडळ स्थापन झाल्यापासून शासनाच्या विविध अनुदानातून ७० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. अधिकार्‍यांमधील सुंदोपसुंदीमुळे सर्व रस्त्यांच्या कामांना जाणीवपूर्वक विलंब होत आहे. तांत्रिक कारणे दाखवून कामे थांबविली जात आहेत. या सर्वांमागे ठेकेदारांचे कल्याण करण्याचा वास येत आहे. येत्या १५ जूनपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे, याची माहिती वरिष्ठ व कनिष्ठ अभियंत्यांना असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरभर खोदण्यात आलेल्या चरींमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीची कोंडी होत असतानाच नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहेत. शारीरिक दुखण्याच्या त्रास सहन करीत नागरिक दैनंदिनी पार पाडत आहेत. येत्या तीन दिवसांत रस्त्याची कामे सुरू न झाल्यास अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू. संबंधित यंत्रणेकडून रस्त्यांची कामे होणार नसतील तर सांगलीतील रस्ते बांधकाम विषयातील तज्ज्ञ अभियंत्यांना घेऊन युवामंचच पूर्णत्वास नेण्यास तयार आहे. तशी परवानगी महापालिकेने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)