शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शंभराव्या नाट्यसंमेलनाची कोरोनाकोंडी दीड वर्षानंतरही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : १०० व्या नाट्यसंमेलनाची कोरोनाकोंडी दीड वर्षानंतरही कायम आहे. कोरोनाची सध्याची तीव्रता पाहता यावर्षीदेखील ...

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : १०० व्या नाट्यसंमेलनाची कोरोनाकोंडी दीड वर्षानंतरही कायम आहे. कोरोनाची सध्याची तीव्रता पाहता यावर्षीदेखील संमेलनाची शक्यता नाही. नाट्यपंढरीतील रसिकांचा यामुळे हिरमोड झाला आहे.

नाट्य परिषदेच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीत नाट्यसंमेलन रद्द करण्यावर एकमत झाले होते; पण कोरोनाची पहिली लाट ओसरू लागल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या. गेल्यावर्षी ७ मार्चला सांगलीत उद्घाटन आणि त्यानंतर राज्यभरात १० ठिकाणी संमेलने अशी रूपरेषा आखण्यात आली होती. तंजावर, सांगली. कोल्हापूर असा प्रवास करीत मुंबईत समाप्तीचे नियोजन होते; पण १४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने रंगाचा बेरंग झाला, तो अजूनही पूर्ववत झालेला नाही. संमेलनासाठी शासनाने अंदाजपत्रकात १० कोटींची तरतूद केली आहे; पण कोरोनामुळे सरकारी तिजोरीवर पडलेला भार पाहता हा निधी मिळण्याची शक्यताही कमी आहे.

मार्चपासूनचे सर्व कार्यक्रम स्थगित झाल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत तशीच स्थिती राहिली. दिवाळीत नाट्य परिषदेच्या नियामक समितीच्या बैठकीत संमेलन तूर्त स्थगित करण्यावर सदस्यांचे एकमत झाले. लॉकडाऊन संपून नाट्य प्रवाह पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर विचार व्हावा, असे सुचविण्यात आले. तशी स्थिती दीड वर्षानंतरही निर्माण झालेली नाही. पहिली लाट ओसरल्यानंतर नाट्यगृहांना ५० टक्के क्षमतेने परवानगी मिळाली होती, त्यावेळीही संमेलनाच्या संकल्पनेने उचल खाल्ली; पण पुन्हा दुसरी लाट सुरू झाल्याने ती गुंडाळून ठेवावी लागली.

सांगलीत यापूर्वी पाच नाट्यसंमेलने झाली आहेत; पण १०० व्या संमेलनाची साऱ्यांनाच उत्सुकता होती. जिल्ह्यातील नाट्य परिषदांच्या सर्व शाखांचा त्यात सक्रिय सहभाग होता.

चौकट

साडेनव्याण्णववे संमेलन झालेदेखील!

१०० वे नाट्यसंमेलन प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिसत नसल्याने काही ज्येष्ठ रंगकर्मींनी मुंबईत साडेनव्याण्णववे संमेलन उरकून घेतले. मुलुंडमध्ये मर्यादित संख्येने कलाकार व रसिकांच्या उपस्थितीत सोहळा रंगला. मात्र, त्यानंतरही १०० व्या संमेलनाची तिसरी घंटा वाजलीच नाही.

कोट

सर्व व्यवहार पूर्णपणे सुरळीत झाल्यानंतरच १०० वे नाट्यसंमेलन होईल. भविष्यात आता कधीही संमेलन झाले तरी ती शंभरावेच असेल, त्यामुळे ते उत्सवी पद्धतीने व राज्यभरात साजरे केले जाईल. तूर्त वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.

- मुकुंद पटवर्धन, नाट्य परिषद, सांगली.